Nagpur: स्टार बसच्या धडकेत महिलेच्या पतीचा मृत्यू
By दयानंद पाईकराव | Updated: August 26, 2023 17:18 IST2023-08-26T17:18:17+5:302023-08-26T17:18:34+5:30
Nagpur: स्टार बसने धडक दिल्यामुळे एका महिलेच्या पतीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी २५ ऑगस्टला दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास घडली.

Nagpur: स्टार बसच्या धडकेत महिलेच्या पतीचा मृत्यू
- दयानंद पाईकराव
नागपूर - स्टार बसने धडक दिल्यामुळे एका महिलेच्या पतीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी २५ ऑगस्टला दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास घडली. विश्वनाथ शेंडे (वय ५०, रा. वॉर्ड नं. २, अमरनगर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते हिंगणाकडून पायदळ जात होते.
तेवढ्यात स्टार बस क्रमांक एम. एच. ३१, सी. ए-६०३५ चा चालक सतिश सुरेश जैस्वाल (वय ५५, रा. राय टाऊन नं. २, बी-९६ एमआयडीसी) याने आपल्या ताब्यातील बस भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांना धडक दिल्यामुळे ते बसच्या मागील चाकात येऊन जागीच ठार झाले. या प्रकरणी हेमलता विश्वनाथ शेंडे (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी बस चालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.