नागपूर : देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेला अटक, केसुरली शिवारातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 09:09 IST2023-03-16T09:08:13+5:302023-03-16T09:09:08+5:30
मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली.

नागपूर : देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेला अटक, केसुरली शिवारातील घटना
विनायक येसेकर
भद्रावती (चंद्रपूर) : नागपूर - चंद्रपूर मुख्य मार्गावरील डाली पेट्रोल पंपजवळ केसुरली येथे शेतशिवारात देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेला स्थानिक गुन्हे शाखा व भद्रावती पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अटक करण्यात आली आहे. बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.
येथील ५२ वर्षीय महिला दोन पीडितांना सोबत घेऊन केसुरली शेत शिवारात राहते आणि घरी देहविक्रीचा व्यवसाय करित असल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे सापळा रचून कारवाई करण्यात आली. देहविक्रीचा व्यवसाय चालविणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासोबत दोन पीडितांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. या व्यवसायात आणखी कोण कोण आहेत, याबाबत तपास चालू असल्याची माहिती ठाणेदार इंगळे यांनी दिल्ली.