शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Nagpur; नागपुरात दोन महिलांनी उडवली होती आरोग्य यंत्रणेची झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 18:48 IST

बाधित रुग्णाच्या घरी घरकाम करणाऱ्या दोन महिलांना लक्षणे आढळून आली. शनिवारी त्यांना मेयोत दाखल केले. नमुने तपासणीसाठी पाठविले. या दोन्ही महिला कोरोनाबाधित रुग्णाच्या वसाहतीलगत वेगवेगळ्या झोपडपट्टीत राहतात.

ठळक मुद्देबाधित रुग्णांच्या घरी करीत होत्या कामनमुने निगेटिव्ह येताच सर्वांनीच टाकला सुटकेचा नि:श्वास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाधित रुग्णाच्या घरी घरकाम करणाऱ्या दोन महिलांना लक्षणे आढळून आली. शनिवारी त्यांना मेयोत दाखल केले. नमुने तपासणीसाठी पाठविले. या दोन्ही महिला कोरोनाबाधित रुग्णाच्या वसाहतीलगत वेगवेगळ्या झोपडपट्टीत राहतात. ही वस्ती दाटीवटीने वसलेली. त्या पॉझिटिव्ह आल्यास मोठा धोका होणार होता. यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेचे लक्ष त्यांच्या नमुन्यांचा अहवालावर होते. रविवारी सकाळीच याबाबत मेयो प्रशासनाला विचारणा झाली. अहवाल निगेटिव्ह असल्याचे कळताच सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला. एक मोठा दिलास आरोग्य यंत्रणेला मिळाला.दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेले दोघे पॉझिटिव्ह येताच त्यांचे कुटुंबातील सदस्य, घरात व दुकानात काम करणारे कर्मचारी, मित्र व शेजाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यात ५० वर संबंधितांचे नमुने घेण्यात आले. यात सात जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरात घरकाम करणाºया दोन महिलांचे नमुने पहिल्या दोन टप्प्यात घेण्यात आले नव्हते. आरोग्य यंत्रणेला याची माहिती मिळताच त्यांनी शनिवारी मेयोच्या प्रयोगशाळेत दाखल केले. या महिला झोपडपट्टीत राहणाºया आहेत. या दोन्ही झोपडपट्ट्या दाट घरांच्या आहेत. यामुळे अहवालात या दोघी पॉझिटिव्ह आल्यास मोठ्या धोक्याची शक्यता होती. त्यांना थोडी फार लक्षणेही असल्याने अघटित तर घडणार नाही ना, या चिंतेत आरोग्य यंत्रणा होती. शनिवारी रात्री त्यांच्या अहवालाबाबत मेयोला विचारपूसही झाली. परंतु नमुन्यांचा अहवाल रविवारी सकाळी येणार होता. संपूर्ण यंत्रणा त्यांच्या अहवालाच्या प्रतीक्षेत होती. या महिला पॉझिटिव्ह आल्यास काय उपाययोजना करावयाच्या तेही प्राथमिक स्वरूपात ठरले होते. रविवारी सकाळीच आरोग्य यंत्रणेचे फोन मेयो प्रशासनला गेले. त्यांनी दोन्ही महिलेचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगताच मोठा दिलासा मिळाला. सध्या या दोन्ही महिलांना मेयोतून सुटी देऊन पुढील १४ दिवस घरीच थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. 

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस