Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 

By नरेश डोंगरे | Updated: June 21, 2025 07:54 IST2025-06-21T07:53:40+5:302025-06-21T07:54:20+5:30

Nagpur News: नागपूरहून दिल्लीकडे निघालेल्या राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक झाल्यामुळे प्रवाशात दहशत निर्माण झाली. आज रात्री हबीबगंजनजीक ही घटना घडल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले आहे.

Nagpur: Stone pelting on Rajdhani Express, panic among passengers | Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 

Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 

- नरेश डोंगरे   
नागपूर - नागपूरहून दिल्लीकडे निघालेल्या राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक झाल्यामुळे प्रवाशात दहशत निर्माण झाली. आज रात्री हबीबगंजनजीक ही घटना घडल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले आहे.

नेहमीप्रमाणे आज ट्रेन नंबर 22 691 राजधानी एक्सप्रेस नागपूरहून दिल्लीकडे निघाली. सूत्रांच्या माहितीनुसार, रात्री साडेदहाच्या सुमारास ही गाडी  हबीबगंज जवळ आली असताना गाडीच्या खिडक्याच्या काचेवर एकापेक्षा अनेक दगड आदळले. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली.

विशेष म्हणजे यावेळी बी 4 कोच मधील काही प्रवासी जेवन घेत होते. त्यांच्या ताटातही काही दगड पडल्याचे समजते. या एकूणच प्रकारामुळे प्रवाशांमध्ये खळबळ निर्माण झाली. या प्रकाराची माहिती दिल्लीकडे जात असलेल्या नागपूर मधील प्रवाशांनी रेल्वे मदत ॲपच्या माध्यमातून प्रशासनाला दिली. त्यामुळे काही वेळेतच रेल्वेतील आरपीएफ जवान नमूद कोच मध्ये दाखल झाले. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फुटलेल्या काचाची दुरुस्ती केली. त्यानंतर तब्बल दोन तास विलंबाने ही गाडी दिल्लीकडे रवाना झाली.

विशेष म्हणजे, यापूर्वी देखील वंदे भारत एक्सप्रेस वर ठिकठिकाणी दगडफेक करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या महिन्यात नागपुरातही कामठीनजिक अशीच एक घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपींवर कारवाई होत नसल्यामुळे गुन्हेगार अशी हिम्मत दाखवत असल्याचे बोलले जाते.

Web Title: Nagpur: Stone pelting on Rajdhani Express, panic among passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.