शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

एकतेसाठी धावले नागपूर !

By admin | Updated: November 1, 2014 02:43 IST

देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या प्रयत्नांना सलाम म्हणून हजारो ...

नागपूर : देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या प्रयत्नांना सलाम म्हणून हजारो नागपूरकरांनी शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकता दौडीत (रन फॉर युनिटी) उत्साहाने भाग घेतला.दौडीत विद्यार्थी, खेळाडू, अधिकारी, पोलीस, एनसीसी आणि एनएसएस कॅडेटसह आबालवृद्धांचा सहभाग होता. सकाळी ७.४५ वाजता दौडीचा प्रारंभ झाला. दहा वर्षांच्या स्केटिंग करणाऱ्या मुलींपासून ७५ वर्षांच्या वृद्धांपर्यंत सारेच देशासाठी धावले.या दौडीत उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, गिरीश जोशी, संगीतराव, अजय रामटेके, प्रकाश पाटील, दिलीप सावरकर, आशा पठाण, अनिता मेश्राम, सुजाता गंधे यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. सोबतीला विविध रंगी पोशाखात असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांमुळे वातावरण क्रीडामय झाले होते. सोबतीला राष्ट्रध्वजही होते. अनेकांनी भारतमाता की जय..., सरदार पटेल अमर रहे... अशा गगनभेदी घोषणा देत राष्ट्रभक्ती जागविण्याचा प्रयत्न केला. आकाशवाणी चौक, व्हीसीए चौक, एनआयटी चौक, एलआयसी चौकमार्गे दौड संविधान चौकात आल्यानंतर दौडीची सांगता झाली. प्रारंभी संविधान चौकातील मुख्य व्यासपीठावर विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी हजारो उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. यावेळी व्यासपीठावर सहपोलिस आयुक्त अनुपकुमारसिंग, मनपा आयुक्त शाम वर्धने, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, सीईओ शिवाजीराव जोंधळे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त हेमंत पवार, प्रभारी क्रीडा उपसंचालक विजय संतान, उपायुक्त अप्पासाहेब धुळज यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन मनपा अतिरिक्त आयुक्त प्रमोद भुसारी आणि रेणुका देशकर यांनी केले.