नागपूर: ट्रेनमधून सोन्याचांदीच्या तस्करीचा डाव उधळून लावत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्यारेल्वे सुरक्षा दलाने साडेतीन कोटींचे सोन्याचांदीचे दागिने ताब्यात घेतले. ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे सोन्या-चांदीची तस्करी करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
विशेष उल्लेखनीय असे की, लोकमतने यापुर्वी अनेकदा रेल्वे गाड्यांमधून सोन्याची तस्करी होत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. तर, ७ ऑक्टोबरच्या अंकात 'रेल्वेतून धोकादायक स्फोटक फटाक्यांचीही बेमालूमपणे तस्करी' केली जात असल्याचे वृत्त प्रकाशित केले. त्याची गंभीर दखल घेत दपूम रेल्वेच्या सुरक्षा दलाचे आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी विशेष पथके नियुक्त करून प्रत्येक कोचची कसून तपासणी करण्याचे आदेश जारी केले होते. त्यानुसार, ट्रेन नंबर १२८५५ बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये आमगाव ते गोंदिया दरम्यान आरपीएफचे निरीक्षक कुलवंत सिंग, एन. पी. पांडे यांच्या नेतृत्वात एएसआय के. के. निकोडे तसेच सहकारी व्ही. के. कुशवाह यांनी तपासणी सुरू केली. कोच नंबर एस-०६ मध्ये त्यांना संशय आल्याने त्यांनी एका व्यक्तीची बॅग तपासली असता त्यांना सोन्याचांदीचे घबाडच हाती लागले.
गोंदियातील गोल्ड सप्लायर नरेश पंजवानी (वय ५५, रा.श्रीनगर बंबाभवनजवळ, गोंदिया) याच्या बॅगमध्ये चक्क ३.२७ कोटींचे सोने आणि साडेसात किलो चांदी सापडली. या संबंधाने संशयीत पंजवानी समाधानकारक माहिती देत नसल्याने आरपीएफच्या वरिष्ठांनी हे प्रकरण डीआरडीआयच्या (डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) अधिकाऱ्यांना कळविले. त्यांनी या प्रकरणाची चाैकशी करून रविवारी गुन्हा दाखल केला.
जप्त करण्यात आलेले घबाड
सोन्याची बिस्किटे, मंगळसूत्र, कडे आणि ईतर दागिने(वजन- २ किलो, ६८३ ग्राम, किंमत ३ कोटी २७ लाख ३७ हजार ५०० रुपये) चांदीची नाणी, बिस्किटे, पैजन आणि ईतर दागिने (वजन १ किलो, ४४० ग्राम- किंमत १० लाख ४७ हजार रुपये) एकूण जप्त केलेला ऐवज- ३ कोटी ३७ लाख ८४ हजार ५०० रुपये.
Web Summary : Railway security seized 35 million worth of gold and silver jewelry from a train in Nagpur, foiling a smuggling attempt. One person arrested with gold biscuits and silver. The Directorate of Revenue Intelligence is investigating.
Web Summary : नागपुर में रेलवे सुरक्षा बल ने एक ट्रेन से साढ़े तीन करोड़ रुपये के सोने-चांदी के आभूषण जब्त किए, तस्करी का प्रयास विफल। एक व्यक्ति गिरफ्तार, राजस्व खुफिया निदेशालय जांच कर रहा है।