शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

तीन महिने उलटूनही नागपूर दंगलग्रस्तांना अद्याप भरपाई मिळाली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:12 IST

Nagpur : फाइल क्लीअर करण्यासाठी महिनाभर एसडीएम कार्यालयात चकरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात मार्चमध्ये झालेल्या दंगलीत नुकसान झालेल्या वाहनांच्या मालकांना प्रशासनाकडून अद्याप भरपाई मिळालेली नाही. तीन महिने उलटूनही त्यांना सरकारी विभागांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. पोलिस आणि प्रशासनाने भरपाईची रक्कम निश्चित केल्यानंतरही ती देण्यास एवढा विलंब का होत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

या पीडितांपैकी एक असलेले चिटणवीस पार्कजवळ राहणारे मधुसूदन सिंघानिया. त्यांनी 'लोकमत'शी बोलताना आपली व्यथा सांगितली. सिंघानिया म्हणाले, १७ मार्च रोजी महाल परिसरात अचानक दंगल उसळली. यादरम्यान, दुरुगकर चाळ परिसरात पार्क केलेली एक कार दंगलखोरांनी पेटवून दिली. बाइक क्रमांक सीजी १० बीके ३६२४ देखील या कारजवळ पार्क केलेली होती. दंगलखोरांनी या बाइकची तोडफोड केली आणि गाडीचा आरसा आणि हेल्मेटही सोबत घेऊन गेले. घटनेनंतर पोलिसांनी जबाब नोंदवून पंचनामा केला. पण, पंचनाम्याची प्रत मिळविण्यासाठी अनेक दिवस गणेशपेठ पोलिसांकडे जावे लागले. फाइल क्लीअर करण्यासाठी महिनाभर एसडीएम कार्यालयात चकरा मारल्या. काम न झाल्याने अखेर एका वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटून विनवणी केली. 

त्यानंतर फाइल क्लीअर करण्यात आली. मधुसूदन सिंघानिया यांना मिळालेल्या माहितीनुसार, २८ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाने हर्ष बुल्स प्रायव्हेट लिमिटेड, बिलासपूरच्या नावाने १० हजार रुपये भरपाई म्हणून मंजूर केले. त्यांच्याप्रमाणेच, विलास शंकर यांच्या घराच्या नुकसानीसाठी ३५ हजार रुपये, अक्षय श्रीवास यांच्या दुकानाच्या नुकसानीसाठी २० हजार आणि संकेत मंगरूळकर यांच्या गाडीच्या नुकसानीसाठी ४० हजार रुपये मंजूर करण्यात आले. परंतु, गेल्या एक महिन्यापासून सिंघानिया भरपाई मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात फेऱ्या मारत आहेत.

टॅग्स :nagpurनागपूर