शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

पोलिसांनी लढवली शक्कल, अन् लग्नात चोरी गेलेला सोन्याचा हार महिलेला 'असा' मिळाला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2022 17:11 IST

पोलिसांनी शक्कल लढवली अन् सात तोळ्यांचा चोरी गेलेला हार महिलेला परत मिळवून दिला.

नागपूर : वर्दळीच्या ठिकाणी समारंभात चोरीच्या घटना काही नव्या नाही. तसेच, चोरी गेलेली वस्तू परत मिळेल की नाही याचीही शाश्वती नसते. परंतु, कधी-कधी चमत्कारही घडून येतात. असाच एक किस्सा या लग्नसमारंभात घडला. पोलिसांनी भन्नाट आयडिया केली अन् सात तोळ्यांचा चोरी गेलेला हार महिलेला परत मिळवून दिला.

बुधवारी रात्री बहादुरातील एका लॉनमध्ये एक लग्नसमारंभ पार पडले. नवरीच्या पाठवणीचा कार्यक्रम पार पडला आणि सर्व पाहुणे घरी जाण्याच्या तयारीत होते. इतक्यात आरडाओरड सुरू झाली. काटोल येथील एका महिलेचा सात तोळ्यांचा जवळपास साडेतीन लाख रुपये किमतीचा हार चोरीला गेला होता. तिने नातेवाईकांना विचारपूस केली पण कुणालाच काही माहित नव्हते. 

या लग्नसमारंभात २०० हुन अधिक पाहुण्यांची उपस्थिती होती. महिलेने तिचा हार एका पिशवीत काढून ठेवला होता. पाठवणीचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व पाहुणेही निघायच्या तयारीत होते. तीदेखील निघणार होती, त्याआधी तिने आपल्याजवळील वस्तू तपासून पाहिल्या असता पिशवीतील हार चोरीला गेल्याचे तिच्या लक्षात आले. तिने सर्वांना विचारले पण काहीच झाले नाही. शेवटी पोलिसांना कळविण्यात आले.

पोलीस सदर स्थळी पोहोचले. यावेळी नवरीच्या वडिलांनी नातेवाईकांची बदनामी व लग्नकार्यात डाग नको म्हणून पोलिसांना विनंती केली. पोलिसांनीही वधूच्या वडिलांच्या विनंतीचा मान ठेवत एक शक्कल लढवली. त्यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांना गोळा केले. सभागृहातील एका लहान खोलीकडे बोट दाखवत ज्यानी कुणी हार चोरला असेल त्याने त्या खोलीत असलेल्या गादीखाली तो हार ठेवून बाहेर पडावे, असे म्हटले. असे केल्यास कुणावरही गुन्हा दाखल होणार नाही, असेही सांगितले.  

त्यानुसार एक-एक करत सर्व नातेवाईक त्या खोलीत गेले व बाहेर पडले. यानंतर पोलिसांनी खोलीची तपासणी केली असता चोरी गेलेला हार गादीखाली मिळून आला. हार परत मिळाल्याने महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, तर लग्नकार्यात आलेले विघ्न कुठलाही वाद न होता टळल्याने वधूपित्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. अशाप्रकारे कुणालाही न दुखावता पोलिसांनी शक्कल लढवत या प्रकरणातून तोडगा काढला. पोलिसांच्या या युक्तीचे पोलीस उपायुक्तांनीही कौतुक केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरPoliceपोलिस