नागपूरला भूकंपाचा धोका नाही

By Admin | Updated: May 23, 2014 01:07 IST2014-05-23T01:07:54+5:302014-05-23T01:07:54+5:30

बुधवारी झालेला भूकंप हा इंडियन प्लेट युरेशियन प्लेटकडे घसरल्यामुळे झाला होता. नागपूरही याच्या प्रभावात आले, मात्र सुदैवाने काही नुकसान झाले नाही. एवढ्या तीव्रतेच्या भूकंपामुळे नागपूरला

Nagpur is not a threat of earthquake | नागपूरला भूकंपाचा धोका नाही

नागपूरला भूकंपाचा धोका नाही

इंडियन प्लेट घसरली : पुन्हा नाही झाले कंपन

नागपूर : बुधवारी झालेला भूकंप हा इंडियन प्लेट युरेशियन प्लेटकडे घसरल्यामुळे झाला होता. नागपूरही याच्या प्रभावात आले, मात्र सुदैवाने काही नुकसान झाले नाही. एवढ्या तीव्रतेच्या भूकंपामुळे नागपूरला कुठलाही धोका नाही, असे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) ने स्पष्ट केले आहे. भूकंपाच्या कंपनाच्या केंद्रबिंदूचे अंतर नागपूरपासून बरेच आहे. भूकंपाची तीव्रताही कमी असल्यामुळे त्सुनामीचाही धोका नाही. भूवैज्ञानिकांच्या मते हा भूकंप भूप्रदेशात झाला असता तर जास्त नुकसान झाले असते. बंगालच्या खाडीतील एपिसेंटर (भूकंपाचे केंद्र) मुळे याचा परिणाम ओरिसा, विशाखापट्टणम, बंगरुळुसहीत दिल्लीपर्यंत पहायला मिळाला. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणद्वारा देशातील सर्व सहाही क्षेत्रातील मूल्यांकन व विश्लेषण केले जात आहे. याबाबत नागपूर विभागाचे उपमहाप्रबंधक प्रभाकर राऊत यांनी सांगितले की, या रिजनमध्ये (महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड) भूकंपामुळे नुकसान झाल्याची माहिती नाही. या भूकंपाचे केंद्र नागपूरपासून ९८९ किलोमीटर अंतरावर होते. १९३८ मध्ये हादरले होते नागपूर नागपुरात भूकंपाचे तीव्र झटके १४ मार्च १९३८ मध्ये जाणवले होते. यावेळी भूकंपाचे केंद्र परतवाडाच्या गवळीगड येथे होते. यावेळी रिश्टर स्केलवर ६ एवढी तीव्रता नोंदविल्या गेली होती. नागपुरातही याचे कंपन ४ पेक्षा जास्त नोंदविल्या गेले होते. त्यावेळी नागपूर व परिसरातील घरांच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. सुदैवाने कुठलीही जीवहानी झाली नव्हती. (प्रतिनिधी)

Web Title: Nagpur is not a threat of earthquake