नागपूर : पंजाबपोलिसांत ‘लेडी सिंघम’ म्हणून दरारा निर्माण करणाऱ्या नागपूरकर कन्या नीलांबरी विजय जगदाळे यांची लुधियाना (पंजाब) परिक्षेत्राच्या पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) म्हणून नियुक्ती झाली आली. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी हा आव्हानात्मक पदभार स्वीकारला आहे. ही गौरवास्पद बातमी आज महाराष्ट्र पोलिस दलात चर्चेला आली आहे.
देशातील सीमावर्ती आणि संवेदनशील राज्य म्हणून पंजाबचे नाव आहे. पंजाबमधील वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी देशभरात नाव असलेल्या लुधियानासारख्या महत्त्वाच्या क्षेत्राची जबाबदारी त्यांना सोपविण्यात आली आहे. गन कल्चर, ड्रग्ज नेटवर्क आणि संघटित गुन्हेगारीचे मोठे आव्हान त्या क्षेत्रात असून, हे निपटून काढण्याचे आव्हान लेडी सिंघम नीलांबरी जगदाळे यांनी स्वीकारली आहे.
२००८ मध्ये पंजाब कॅडर निवडल्यानंतर त्यांनी रूपनगर येथून सेवेला सुरुवात केली. त्यानंतर लुधियाना, पठाणकोट आणि चंडीगडसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये पोलिस अधीक्षक म्हणून काम करत त्यांनी प्रभावी आणि परिणामकारक पोलिसिंगची ओळख निर्माण करून दिली.
मोहाली आणि फरीदकोट येथे गुप्तचर विभागाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांत यश मिळवले. डिसेंबर २०२४ मध्ये त्यांची काउंटर इंटेलिजन्स विभागाच्या उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती झाली होती. आता लुधियानाच्या डीआयजी म्हणून त्या पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. शहराची कन्या देशातील सर्वात आव्हानात्मक पोलिस कॅडरमध्ये आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवत असल्याचे वृत्त आल्याने नागपूरकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.
आईकडून मिळाला शिस्तीचा वारसा
नीलांबरी यांचे वडील विजय जगदाळे हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी असून, आई शोभा आणि आजोबा मनोहर यांच्याकडून मिळालेला करड्या शिस्तीचा वारसा त्यांच्या कार्यशैलीत उमटला आहे. त्या रवीनगर येथील सी. पी. अँड बेरार स्कूलच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांनी शिवाजी कॉलेजमधून १२वी आणि विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स शाखेतील अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच त्यांनी यूपीएससीत जाण्याचे स्वप्न पाहिले होते. इंजिनिअरिंगनंतर इंदौर येथील एका मल्टिनॅशनल कंपनीतील त्यांना नोकरी मिळाली होती.
Web Summary : Nilambari Jagdale, Nagpur native, appointed Ludhiana DIG, Punjab, known as 'Lady Singham'. Tasked with tackling gun culture and organized crime. Her career began in Rupnagar, showcasing effective policing in key Punjab cities.
Web Summary : नागपुर की नीलांबरी जगदाले लुधियाना की डीआईजी नियुक्त, पंजाब में 'लेडी सिंघम' के रूप में प्रसिद्ध। उन्हें बंदूक संस्कृति और संगठित अपराध से निपटने का काम सौंपा गया है। रूपनगर में करियर शुरू, पंजाब के शहरों में प्रभावी पुलिसिंग का प्रदर्शन।