BMW कारमध्ये आले अन् रोपं चोरुन नेले, गुरुग्रामनंतर नागपूरात घडली घटना; पाहा Video...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 18:38 IST2023-03-16T18:37:37+5:302023-03-16T18:38:59+5:30
G-20 परिषदेच्या निमित्ताने शहराला सजवण्यासाठी ठेवलेली रोपं चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.

BMW कारमध्ये आले अन् रोपं चोरुन नेले, गुरुग्रामनंतर नागपूरात घडली घटना; पाहा Video...
नागपूर: काही दिवसांपूर्वी हरियाणातील गुरुग्राममधून एक विचित्र प्रकरण समोर आले होते. 40 लाख रुपयांच्या अलिशान गाडीतून आलेल्या दोघांनी G-20 परिषदेनिमित्ताने शहराला सजवण्यासाठी ठेवलेली रोपं चोरुन नेली. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्या घटनेनंतर आता नागपूरमध्येही अशीच घटना घडली आहे.
Video: याला काय म्हणावं..? 40 लाखांच्या गाडीत आले अन् चौकात ठेवलेली रोपं चोरुन नेले
रिपोर्टनुसार, नागपुरातील व्हायरल व्हिडिओ 15 मार्चचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेजण आलिशान बीएमडब्ल्यू कारमधून येतात आणि शहराला सजवण्यासाठी चौकात ठेवलेली रोपं गाडीच्या डिक्कीत टाकून घेऊन जातात. ही रोपं G-20 कार्यक्रमासाठी शहरभर लावण्यात आली आहे.
@NagpurPolice@trafficngp@nmccommissioner Youths stealing Plants set up for G20 event on wardha Road, Nagpur, Car MH 01 BB 8238. SAD, the culprits should be apprehended and punished. pic.twitter.com/uKe2ZPKO3o
— Square and Compass (@DebuBhusawal) March 16, 2023
स्वेअर अँड कम्पास नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर केला असून, व्हिडिओ वर्धा रोडवरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या ट्विटमध्ये त्याने गाडीनंतरही दिला असून, नागपूर पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होतोय.