Nagpur: तरुणीवर अत्याचार करणारा नराधम ‘लोकेशन’च्या आधारे जेरबंद
By योगेश पांडे | Updated: July 30, 2023 16:20 IST2023-07-30T16:19:44+5:302023-07-30T16:20:03+5:30
Nagpur Crime News: गोंदियातील एका तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला त्याच्या मोबाईलच्या ‘लोकेशन’च्या आधारे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

Nagpur: तरुणीवर अत्याचार करणारा नराधम ‘लोकेशन’च्या आधारे जेरबंद
- योगेश पांडे
नागपूर : गोंदियातील एका तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला त्याच्या मोबाईलच्या ‘लोकेशन’च्या आधारे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
प्रथम धीरज नकवे (२१, गोकुळपेठ) असे आरोपीचे नाव असून तो मुळचा चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील आहे. त्याची गोंदियातील २६ वर्षीय पिडीतेची ओळखी होती. त्याने तिच्याशी मोबाईलवर संवाद साधला व तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखविले. तिने त्याच्यावर विश्वास ठेवला व त्याच्या बोलविण्यावर ती नागपुरात आला. प्रथम तिला अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्याच्या भाड्याच्या खोलीत घेऊन गेला व तेथे तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला असता त्याने तिला मारहाण केली व जबरदस्तीने अत्याचार केला.
१० ऑगस्ट २०२२ ते २७ जुलै २०२३ या कालावधीत त्याने तिच्यावर अत्याचार केले. तिने लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने तिला शिवीगाळ करत धमकी दिली. अखेर तिने अंबाझरी पोलीस ठाण्यात धाव घेत त्याच्याविरोधात तक्रार केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला व मोबाईलच्या ‘लोकेशन’वरून त्याचे नेमके स्थान ‘लोकेट’ करत सापळा रचून त्याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर सादर करण्यात आले व त्याला १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.