शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपा : दिवाळी संपली;आता टॅक्स वसुली : आचारसंहितेमुळे वसुलीला २८ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 22:46 IST

महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीला विधानसभा निवडणुकीचा फटका बसला. निवडणूक संपल्याने मालमत्ता विभाग आता पुन्हा सक्रिय झाला असून थकबाकी वसुलीच्या कामाला लागला आहे.

ठळक मुद्देथकबाकीदारावर कारवाई करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीला विधानसभा निवडणुकीचा फटका बसला. निवडणूक आचारसंहितेपूर्वी वसुलीने जोर पकडला होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत वसुली ३५ कोटींनी अधिक होती.आचारसंहिता लागू होताच मालमत्ता विभागातील २०० कर्मचारी निवडणुकीच्या कामाला लागले. यामुळे वसुली ठप्प पडली होती. २३ ऑक्टोबरपर्यत ११७ कोटींचीच कर वसुली झाली. गेल्या वर्षी या तारखेला ९७ कोटींची वसुली झाली. निवडणूक नसती तर वसुली १४५ कोटीवर गेली असती. आचारसंहितेमुळे वसुलीला २८ कोटींचा फटका बसला. निवडणूक संपल्याने मालमत्ता विभाग आता पुन्हा सक्रिय झाला असून थकबाकी वसुलीच्या कामाला लागला आहे.मालमत्ता कर वसुलीचे गेल्या वर्षी उद्दिष्ट ५०९ कोटी होते. परंतु वसुली २३० कोटीवर थांबल्याने यंदा उद्दिष्ट कमी करून ४५० कोटी ठेवण्यात आले आहे. २० सप्टेेंबर २०१९ पर्यंत महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कर वसुलीतून ९७ कोटी जमा झाले. गेल्या वर्षात याच कालावधीत ६७ कोटी जमा झाले होते. विभागाची वसुली ३० कोटींनी वाढली होती. त्यानंतर कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतल्याने याचा कर वसुलीवर परिणाम झाला.१ लाख ७७ हजार लोकांनी चालू वर्षातील कर भरला. तर ८० हजार ६७६ थकबाकीदारांनी कर भरला. अजूनही ३ लाख ६२ हजार ४५९ मालमत्ताधारकांकडे ४७३ कोटींची थकबाकी आहे. थकबाकी भरावी यासाठी महापालिकेतर्फे आकाशवाणी, सिमेनागृह, वृत्त वाहिन्यावर प्रसिद्धी करून मुदतीपूर्वी कर व थकबाकी भरून कायदेशीर कारवाई टाळण्याचे आवाहन केले जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.७०० वॉरंट बजावलेथकबाकीदारांना वारंवार नोटीस बजावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने ७०० मालमत्ताधारकांवर वॉरंट बजावण्यात आले. ३२० मालमत्ता जप्त करण्यात आल्या. जप्तीनंतरही थकबाकी न भरणाऱ्यांची मालमत्ता लिलावात काढण्यात आली. विशेष म्हणजे लिलावात मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना जागेची आखीव पत्रिका दिली जात आहे. नगररचना विभागात संबंधितांच्या नावाची नोंद केली जात आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर