Nagpur Fraud : डिलिव्हरी बॉयने महागड्या वस्तू काढून ग्राहकांचे २२.३४ लाखांचे पार्सल हडपले; कंपनीतील ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:59 IST2025-12-29T12:58:23+5:302025-12-29T12:59:12+5:30
Nagpur : ग्राहकांचे पार्सल हडपून २२ लाख ३४ हजार ९६३ रुपयांचा अपहार करणाऱ्या इन्स्टाकार्ट कंपनीतील ११ डिलिव्हरी बॉय विरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Nagpur Fraud : Delivery boy snatches customer's parcel worth Rs 22.34 lakhs by removing expensive items; Case registered against 11 people in the company
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्राहकांचे पार्सल हडपून २२ लाख ३४ हजार ९६३ रुपयांचा अपहार करणाऱ्या इन्स्टाकार्ट कंपनीतील ११ डिलिव्हरी बॉय विरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कुणाल पांडुरंग गोंडे (रा. नेहरूनगर, गांधी वॉर्ड, बल्लारपूर), श्रेयस उपेंद्र मेश्राम (रा. पिंपळगांव, भंडारा), साहील ईश्वर मेश्राम (रा. दिघोरी, आमगाव, जि. भंडारा) व इतर आठ आरोपींविरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी संगनमत करून ग्राहकांना पाठविण्यात येणारे पार्सल, महागडे मोबाइल व इतर साहित्य ग्राहकांना न पोहोचविता तसेच ऑफिसमध्ये परत न करता आपल्या आर्थिक फायदा करून २२ लाख ३४ हजार ९६३ रुपयांचा अपहार केला.
इन्स्टाकार्ट कंपनीचे इन्फोर्समेंट ऑफिसर प्रकाश रतीलाल शहा (६५, रा. पुणे) यांनी कंपनीचे ऑडिट केले असता हा गैरव्यवहार उघडकीस आला. याप्रकरणी शहा यांच्या तक्रारीवरून राणाप्रतापनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३०६, ३१६ (२), ३ (५) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.