शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

नागपूर जिल्हा: शिवसेना व राष्ट्रवादीपुढे यंदा खाते उघडण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 06:14 IST

भाजपचा धूमधडाका तर काँग्रेसची धडपड : जागा अदलाबदलीवरून युतीत पेच, भाजपच्या आमदारांमध्ये उमेदवारीविषयी धाकधूक

कमलेश वानखेडे 

नागपूर : जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांपैकी ११ जागा भारतीय जनता पक्षाकडे आहेत. त्यामुळे भाजप उत्साही आहे, तर एकमेव जागा असलेली काँग्रेस तग धरण्यासाठी धडपड करीत आहे. गेल्यावेळी स्वबळावर लढलेल्या व पदरी भोपळा आलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीचा यावेळी खाते उघडण्यासाठी कस लागणार आहे. पराभवानंतरही काँग्रेसमधील गटबाजी शमलेली नाही. दुसरीकडे युती झाल्यास जिल्ह्यातील काही जागांच्या अदलाबदलीवरून भाजप-सेनेत पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनेला पूर्व नागपूर, दक्षिण नागपूर, काटोल, रामटेक व सावनेर अशा चार ते पाच जागा हव्या आहेत. या पाचही जागांवर सध्या भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे भाजप एखाद दुसरी जागा वगळता मागे हटण्याची चिन्हे नाहीत. २००९ मध्ये राष्ट्रवादीला हिंगणा व काटोल या दोनच जागा मिळाल्या व त्या जिंकल्याही. त्यामुळे यावेळी कामठी किंवा उमरेड तसेच पश्चिम नागपूर किंवा उत्तर नागपूरची जागा काँग्रेसने सोडावी, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे.

भाजप विद्यमान आमदारांची फौज पुन्हा रिंगणात उतरवेल. पण शिवसेनेशी होणारी तडजोड व पक्षांतर्गत दावेदारी पाहता एखाद दुसऱ्या आमदाराचे तिकीट कापण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढेच नव्हे तर प्रसंगी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मोठा मासा गळाला लागला तर आणखी एखाद्या आमदाराला नारळ दिले जाऊ शकते. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपच्या बहुतांश विद्यमान आमदारांमध्ये धाकधूक आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात फारसे आव्हान नाही. येथे काँग्रेसकडून नगरसेवक प्रफुल्ल गुडधे वगळता दुसरे कुणी इच्छुकही नाही. पश्चिम नागपुरात भाजपचे आ. सुधाकर देशमुख यांच्या जागेवर नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, नरेश बरडे आदी इच्छुक आहेत. काँग्रेसकडून शहर अध्यक्ष विकास ठाकरे पुन्हा इच्छुक आहेत.

दक्षिण नागपुरात आ. सुधाकर कोहळे यांच्यासह माजी आमदार मोहन मते यांनी जोरात प्रयत्न चालविले आहे. काँग्रेसमधून बडतर्फ माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत हे नुकतेच शिवसेनेत दाखल झाले असून, त्यांनीही दक्षिणवर दावा केला आहे.मध्य नागपुरात आ. विकास कुंभारे यांच्यासह माजी महापौर प्रवीण दटके यांनीही दावा केला आहे. येथे काँग्रेसमधील इच्छुकांची यादी लांबलचक आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर नागपुरात भाजपचे मताधिक्य घटल्यामुळे आ. डॉ. मिलिंद माने अडचणीत आहेत. मात्र, येथे काँग्रेसमध्ये मोठी गटबाजी आहे. माजी मंत्री नितीन राऊत पुन्हा इच्छुक आहेत. पूर्व नागपुरात आ. कृष्णा खोपडे यांना पक्षांतर्गत आव्हान नाही. काँग्रेसकडून अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, प्रवक्ते अतुल लोंढे तर राष्ट्रवादीकडून गटनेते दुनेश्वर पेठे इच्छुक आहेत.

नागपूर ग्रामीणमध्ये काटोलमध्ये आशिष देशमुख यांनी भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे ही जागा आता भाजप लढते की शिवसेनेला सुटते, याकडे लक्ष लागले आहे. येथे राष्ट्रवादीकडून माजी मंत्री अनिल देशमुख कामाला लागले आहेत. हिंगण्यात भाजपचे आ. समीर मेघे यांना पक्षात सध्यातरी पर्याय नाही. येथे राष्ट्रवादीकडून माजी मंत्री रमेश बंग व काँग्रेसकडून कुंदा राऊत इच्छुक आहेत. सावनेरमध्ये काँग्रेसचे आ. सुनील केदार यांना लक्ष्य करण्याची तयारी भाजपने चालविली आहे. गेल्यावेळी येथे शिवसेना थोड्याच फरकाने हरल्यामुळे यावेळी शिवसेना तिकिटासाठी आग्रही आहे.

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यशैलीपुढे विरोधक हतबल आहेत. येथे काँग्रेसकडून अनेक जण तयारीत आहेत. रामटेकमध्ये भाजपचे आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांना तिकिटासाठी शिवसेनेचे माजी आमदार आशिष जयस्वाल यांच्याशी झुंज द्यावी लागेल. शिवसेना या जागेसाठी टोकाची भूमिका घेऊ शकते. काँग्रेसकडून अनेक जण इच्छुक आहेत. उमरेडमध्ये भाजपचे आ. सुधीर पारवे यांच्या विरोधात पुन्हा एकदा काँग्रेसकडून डॉ. संजय मेश्राम व राजू पारवे इच्छुक आहेत. ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात वळविण्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत.

लोकसभा निवडणुकीत बसपाचा जोर ओसरला. वंचित आघाडीला मतदारांनी वंचितच ठेवले. त्यामुळे विधानसभेसाठी या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचा कस लागेल.सध्याचे बलाबल - भाजप ११ । शिवसेना ०० । काँग्रेस ०१। राष्ट्रवादी ००

२०१४च्या निवडणुकीत सर्वात मोठा विजयदक्षिण-पश्चिम नागपूर : देवेंद्र फडणवीस एकूण मते : १,१३,९१८ फरक : ५८,९४२सर्वात कमी मताधिक्क्याने पराभवकाटोल : अनिल देशमुख (राष्ट्रवादी) ५, ५५७ (विजयी : आशिष देशमुख, भाजप )

टॅग्स :nagpurनागपूरBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019