शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
2
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
3
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
4
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
5
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
6
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
7
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
8
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
9
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
10
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
11
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
12
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
13
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
14
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
15
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
16
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
17
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
18
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
19
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
20
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू

देशभक्तीच्या रंगात रंगले नागपूर शहरवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 11:30 PM

लोकमत सखी मंच, उन्नती फाऊंडेशन आणि महामेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘आय लव्ह माय इंडिया’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सिव्हिल लाईन्सस्थित वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कलावंतांद्वारे देशभक्तीवर आधारित गीत-संगीताचे शानदार सादरीकरण करण्यात आले.

ठळक मुद्दे‘आय लव्ह माय इंडिया’ कार्यक्रमात गीत-संगीताचे उत्साही सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमत सखी मंच, उन्नती फाऊंडेशन आणि महामेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘आय लव्ह माय इंडिया’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सिव्हिल लाईन्सस्थित वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कलावंतांद्वारे देशभक्तीवर आधारित गीत-संगीताचे शानदार सादरीकरण करण्यात आले. देशभक्ती गीतांनी एकीकडे श्रोत्यांमध्ये देशभक्तीचा भावना जागविली तर दुसरीकडे नृत्याच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. लोढा गोल्ड टीएमटी बार, सनफीस्ट आणि महावीर मेवावाला हे सहप्रायोजक होते.याप्रसंगी प्रामुख्याने लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, माजी खासदार अजय संचेती, माजी मंत्री अनिस अहमद, आमदार कृष्णा खोपडे, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, उद्योजक नितीन खारा, लोढा टीएमटी कंपनीचे संचालक सुरेंद्र लोढा, वर्धमान बँकेचे अध्यक्ष अनिल पारख, उपाध्यक्ष नरेश पाटणी, भाजपा नेता जयप्रकाश गुप्ता, छात्र जागृतीचे अध्यक्ष राजेश बागडी, नगरसेवक निशांत गांधी आणि नगरसेवक जुल्फीकार भुट्टो उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उन्नती फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल कोटेचा यांनी केले. संचालन डॉ. मनोज साल्पेकर यांनी केले. आयोजनाच्या यशस्वीतेसाठी मनीष छल्लानी, मुस्तफा टोपीवाला, रिंकू जैन, लोकेश बरडिया, आशिष पांडे, श्रीकांत ढोलके, राजू वारजूरकर, ऋषी कोचर, आशिष दीक्षित, रितेश सोनी, नीलेश देशभ्रतार, गोपाल पट्टम, अरिहंत बैद, महेश श्रीवास, प्रमोद मोहाडीकर, महेश कुकडेजा, सैयद मुमताज, मुजाहिद खान, युगल विधावत आदींनी प्रयत्न केले.मुकेश पंचोली यांनी चढविला रंगकार्यक्रमाची सुरुवात डान्स इंडिया डान्स-लिटिल मास्टर्सच्या वेनम ग्रुपद्वारे सादरीत गणेशवंदनेने झाली. यानंतर ‘मंगल मंगल..., जिंदा है तो..., मल्हारी मल्हारी...’ या गीतांचे सादरीकरण करण्यात आले. ए.जे. डान्स ग्रुपने देशभक्ती गीतांवर नृत्याची शानदार झलक दाखविली. यादरम्यान इंडियन आयडल व सारेगामा फेम प्रसिद्ध युवा गायक मुकेश पंचोली यांनी ‘जहां डाल डाल पर..., मेरे देश की धरती..., अब के बरस..., कर चले हम फिदा..., जिंदगी मौत ना बन जाये..., रंग दे बसंती चोला..., प्रीत जहां की रित सदा...’ आदी गीतांचे गायन करून श्रोत्यांमध्ये देशभक्तीचा उत्साह भरला.यावेळी अभिजित कडू यांनी ‘ले जाये कहां हवाएं..., झुमका बरेलीवाला..., सुनो गौर से दुनियावालो..., माँ तुझे सलाम..., ऐ वतन वतन मेरे आबाद रहे...’ अशा गीतांचे गायन करून देशभक्तीचा भाव जागविला.जवाहरलाल दर्डा संगीत कला अकादमीचे बहारदार सादरीकरणकार्यक्रमादरम्यान जवाहरलाल दर्डा संगीत कला अकादमीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करीत कार्यक्रमाची रंगत वाढविली. आरोही मायी, श्लोक मांडवले, आरोही बैसवारे, कीर्ती भट्टड, अनन्या भागवतकर, विहान मून, आरोही वरघाडे, शुभाश्री वाघमारे व अनन्या साहू यांनी छोडो कल की बाते... हे गीत सामूहिकपणे सादर केले. रिया नवघरे, दीप्ती पारमोरे, श्रेष्ठा सरदार, दीपमाला लोहरा, साक्षी देठे आणि मानसी जाने यांनी ‘देश मेरा रंगीला...’ गीताचे बहारदार सादरीकरण केले.

टॅग्स :musicसंगीतIndiaभारत