शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

नागपुरात वीज बिलाविरुद्ध वाजले नगाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 8:19 PM

लॉकडाऊन दरम्यान तीन महिन्याचे वीज बिल एकाच वेळी पाठवण्याच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. हे बिल रद्द करावे, या मागणीसाठी शनिवारी पक्षातर्फे नगारा आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरात विविध चौकांमध्ये कार्यकर्त्यांनी नगारे वाजवून निषेध केला.

ठळक मुद्दे भाजपचे शहरात विविध चौकात आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊन दरम्यान तीन महिन्याचे वीजबिल एकाच वेळी पाठवण्याच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. हे बिल रद्द करावे, या मागणीसाठी शनिवारी पक्षातर्फे नगारा आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरात विविध चौकांमध्ये कार्यकर्त्यांनी नगारे वाजवून निषेध केला.पक्षाचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दडके यांच्या पुढाकाराने आयोजित आंदोलनात महापौर संदीप जोशी, आ. गिरीश व्यास, आ. अनिल सोले, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे व आ. मोहन मते, मंडळ अध्यक्ष किशोल पलांदूरकर, विनोद कन्हेरे, संजय अवचट, देवेन दस्तुरे, संजय चौधरी, भोजराज डुंबे, संजय ठाकरे, संजय बंगाले, राम आंबुलकर, सुनील मित्रा सहभागी झाले होते. दटके यांनी गोळीबार चौकात नगारा वाजवून राज्य सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, काहीही तारतम्य न ठेवता भरमसाट वीज बिल पाठवणे हे एक षड्यंत्र आहे. दुकाने बंद होती, कोविड संक्रमणामुळे कुलर बंद होते. गरिबांच्या घरात धान्यसुद्धा नव्हते. तरीही १० ते २० हजार रुपयाचे बिल पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे ऊर्जामंत्री नागरिकांना दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. यावेळी वीज अधिभार आणि व्याज रद्द करण्याची मागणीही करण्यात आली.व्हेरायटी चौकात युवा मोर्चाच्या अध्यक्षा शिवानी दाणी, गोळीबार चौकात विणकर आघाडीचे प्रदेश संयोजक श्याम चांदेकर, लॉ कॉलेज चौकात शिक्षक सेलच्या कल्पना पांडे, प्रदीप बिबटे, कमाल चौकात प्रदेश सचिव अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम, अवस्थी चौकात उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष अजय पाठक, गिट्टीखदान चौकात प्रदेश कार्यकारिणी सदस्य माया इवनाते, शेखर येटी, नंदनवन चौकात झोपडपट्टी मोर्चाचे रमेश वानखेडे, दोसर भवन चौकात अल्पसंख्याक मोर्चाचे लाल कुरैशी, शहीद चौकात व्यापारी आघाडीचे अध्यक्ष संजय वाधवानी, बैद्यनाथ चौकात कामगार आघाडीचे जयसिंह कछवाह, प्रतापनगर चौकात स्वच्छता अभियानचे भोलानाथ सहारे, कॉटन मार्केट चौकात माजी सैनिक आघाडीचे राम कोरपे, पुंडलिक सावंत, सक्करदरा चौकात क्रीडा आघाडीचे डॉ. संभाजी भोसले, पीयूष अंबुलकर, गड्डीगोदाम चौकात क्रिश्चियन आघाडीचे विकास फ्रान्सिस, रामनगर चौकात दक्षिण भारतीय आघाडीचे पी.एस.एन. मूर्ती, संदीप पिल्ले, संविधान चौकात लीगल सेलचे अ‍ॅड. नचिकेत व्यास यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

टॅग्स :BJPभाजपाagitationआंदोलनelectricityवीजbillबिल