शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: अंगातील शर्टने केला घात, मिक्सर मशीनमध्ये अडकून वृद्ध कामगाराचा मृत्यू

By योगेश पांडे | Updated: May 21, 2023 16:27 IST

Nagpur: एका प्लान्टमध्ये काम करणाऱ्या कामगारासाठी त्याने घातलेला शर्टच जीवघेणा ठरला. शर्ट मिक्सर मशीनमध्ये अडकला व त्यामुळे आत ओढल्या जाऊन कामगाराचा मृत्यू झाला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

- योगेश पांडे नागपूर : एका प्लान्टमध्ये काम करणाऱ्या कामगारासाठी त्याने घातलेला शर्टच जीवघेणा ठरला. शर्ट मिक्सर मशीनमध्ये अडकला व त्यामुळे आत ओढल्या जाऊन कामगाराचा मृत्यू झाला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

छोटेलाल सिताराम कोरी (६०, शाहपूर गौरी, रिवा, मध्यप्रदेश) असे कामगाराचे नाव आहे. ते गोंडखेरी टी पॉईन्ट, आऊटर रिंग रोड येथील आर.एस.सी. प्लान्टमध्ये पॅनमेकर मिक्सर मशीनवर काम करत होते. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास काम करत असताना त्यांचा शर्ट मिक्सर मशीनमध्ये अडकला व ते मशीनकडे ओढल्या गेले. त्यांच्या सोबतच्या कामगारांनी त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी ठरला नाही. छोटेलाल शर्टमुळे पूर्णपणे आत ओढल्या गेले व मशीनमध्ये अडकून त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे प्लान्टमध्ये खळबळ उडाली. हिंगणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा प्रकार अपघाताने झाला की कुणाच्या बेजबाबदारपणाचा फटका छोटेलाल यांना बसला याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

टॅग्स :nagpurनागपूरDeathमृत्यूAccidentअपघात