Nagpur: अंगातील शर्टने केला घात, मिक्सर मशीनमध्ये अडकून वृद्ध कामगाराचा मृत्यू
By योगेश पांडे | Updated: May 21, 2023 16:27 IST2023-05-21T16:26:46+5:302023-05-21T16:27:10+5:30
Nagpur: एका प्लान्टमध्ये काम करणाऱ्या कामगारासाठी त्याने घातलेला शर्टच जीवघेणा ठरला. शर्ट मिक्सर मशीनमध्ये अडकला व त्यामुळे आत ओढल्या जाऊन कामगाराचा मृत्यू झाला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

Nagpur: अंगातील शर्टने केला घात, मिक्सर मशीनमध्ये अडकून वृद्ध कामगाराचा मृत्यू
- योगेश पांडे
नागपूर : एका प्लान्टमध्ये काम करणाऱ्या कामगारासाठी त्याने घातलेला शर्टच जीवघेणा ठरला. शर्ट मिक्सर मशीनमध्ये अडकला व त्यामुळे आत ओढल्या जाऊन कामगाराचा मृत्यू झाला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
छोटेलाल सिताराम कोरी (६०, शाहपूर गौरी, रिवा, मध्यप्रदेश) असे कामगाराचे नाव आहे. ते गोंडखेरी टी पॉईन्ट, आऊटर रिंग रोड येथील आर.एस.सी. प्लान्टमध्ये पॅनमेकर मिक्सर मशीनवर काम करत होते. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास काम करत असताना त्यांचा शर्ट मिक्सर मशीनमध्ये अडकला व ते मशीनकडे ओढल्या गेले. त्यांच्या सोबतच्या कामगारांनी त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी ठरला नाही. छोटेलाल शर्टमुळे पूर्णपणे आत ओढल्या गेले व मशीनमध्ये अडकून त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे प्लान्टमध्ये खळबळ उडाली. हिंगणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा प्रकार अपघाताने झाला की कुणाच्या बेजबाबदारपणाचा फटका छोटेलाल यांना बसला याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.