Nagpur | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2022 14:21 IST2022-10-12T14:14:48+5:302022-10-12T14:21:43+5:30
नागपूर : लग्नाचे आमिष दाखवत मुलीवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही ...

Nagpur | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; आरोपीला अटक
नागपूर : लग्नाचे आमिष दाखवत मुलीवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
केतन माटे (२०, कृषीनगर, जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १९ वर्षीय मुलगी त्याच्या संपर्कात आली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. ती त्याला वारंवार लग्नाबाबत विचारणा करायची. मात्र, तो नेहमी टाळाटाळ करायचा.
सप्टेंबर २०२० पासून हा प्रकार सुरू होता. १६ सप्टेंबर रोजी तिने त्याला परत विचारणा केली असता, त्याने तिला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर तिने कुटुंबीयांना या प्रकाराची माहिती दिली व जरीपटका पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून माटेविरोधात गुन्हा दाखल केला व त्याला अटक केली.