शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus; नागपुरातील व्हेंटिलेटरवर गेलेल्या ५५ टक्क्यांवर कोरोनाबाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 08:10 IST

Nagpur News नागपुरातील मेयो, मेडिकलसह खासगी कोविड रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेल्या सुमारे ५५ टक्के रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देशासकीयसह खासगी रुग्णालयांतील स्थिती मेयोमध्ये दोन हजारांवर रुग्णांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचा संसर्ग फुफ्फुसावर झालेल्या सहामधून एका रुग्णाला श्वास घेण्याचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. अशा रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवले जाते. नागपुरातील मेयो, मेडिकलसह खासगी कोविड रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेल्या अशा सुमारे ५५ टक्के रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. एकट्या मेयोमध्ये १ मार्च २०२० ते २७ एप्रिल २०२१ पर्यंत ३ हजार ५०२ रुग्णांना विविध व्हेंटिलेटर्सवर ठेवण्यात आले. त्यापैकी १ हजार ४२१ रुग्ण बरे झाले, तर २ हजार ८१ रुग्णांचा मृत्यू झाले आहे.

            कोरोनाचा दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या अधिक होती. यामुळे दरम्यानच्या काळात व्हेंटिलेटर बेडची मागणी वाढली होती. शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेल्या किंवा श्वास घेण्यास कठीण झालेल्या रुग्णांना व्हेंटिलेटर लावले जात होते. सध्या शासकीयसह खासगी रुग्णालयात २०९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तज्ज्ञाच्या मते, व्हेंटिलेटरचे ‘मॅकेनिकल व्हेंटिलेटर’ व ‘नॉन इन्व्हॅसिव्ह व्हेंटिलेटर’ असे दोन प्रकार असतात. ‘मॅकेनिकल व्हेंटिलेटर’ एका ट्यूबद्वारे श्वासनलिकेशी जोडला जातो. हा व्हेंटिलेटर माणसाच्या फुप्फुसापर्यंत ऑक्सिजन पोहोचविण्याचे काम करतो. तर, ‘नॉन इन्व्हॅसिव्ह व्हेंटिलेटर’ रुग्णाचे केवळ तोंड आणि नाक झाकून फुप्फुसापर्यंत ऑक्सिजन पोहोचवतो. ‘नॉन इन्व्हॅसिव्ह व्हेंटिलेटर’च्या तुलनेत ‘मॅकेनिकल व्हेंटिलेटर’वर असलेल्या रुग्णांचे मृत्यू अधिक झाले आहेत. नागपूर जिल्ह्यात मार्च २०२० ते २६ मे २०२१ या कालावधीत ८८५४ रुग्णांचे मृत्यू झाले. यातील सुमारे ५५ टक्क्यांवर रुग्ण हे ‘व्हेंटिलेटर’ होते.

-२४ तासांत एकदाच ड्युमीडिफायरमध्ये भरले जाते पाणी

व्हेंटिलेटरमधील ड्युमीडिफायरमधील पाण्याची पातळी कमी झाल्यावर किंवा २४ तासांतून एकदा पाणी भरले जात असल्याची माहिती खासगीसह शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या काही नातेवाइकांनी दिली. तज्ज्ञाच्या मते, २४ तासांत एकदा ‘ड्युमीडिफायर’मध्ये पाणी भरण्याचा असा काही नियम नाही. तीन दिवसांनंतरही भरता येते. पण, पाणी स्वच्छ असले पाहिजे. पाण्याची पातळी कमी झाल्यावरही पाणी भरले जाते.

-‘ईटी ट्यूब’ ब्लॉक झाल्यावर तातडीने बदलली जाते

कोरोना रुग्णाचा व्हेंटिलेटरची ‘ईटी ट्यूब’ दर सहा तासांनी स्वच्छ करण्याची गरज पडत नाही. परंतु ज्या रुग्णांची ‘ईटी ट्यूब’ ब्लॉक झाली असल्यास ती तातडीने बदलली जाते. व्हेंटिलेटर व रुग्णांशी जोडलेली ‘एचएमई’ फिल्टर’ मात्र रोज बदलले जाते. जर तीन दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तर व्हेंटिलेटरचे ‘सर्किट’ बदलले जाते, अशी माहिती तज्ज्ञानी दिली.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस