शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

पोटच्या विवाहित मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 7:55 AM

मृत हरिलाल हा मूळचा असिनपूर (लखनौ, उत्तर प्रदेश) येथील रहिवासी आहे. त्याच्या बहिणी नागपुरात राहतात. त्यांच्या ओळखीतूनच त्याच्या मुलीचे लग्न नागपुरात झाले होते. त्याची एक मुलगी सुमन (काल्पनिक नाव) मानसिकरीत्या कमकुवत आहे. लॉकडाऊनमध्ये हरिलाल मुलीच्या घरी आला होता.

नागपूर : दारूच्या नशेत पोटच्या विवाहित मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधम बापाला मुलीच्या दिराने मारहाण करून त्याची हत्या केली. पिपळा हुडकेश्वर भागात रविवारी रात्री ही घटना घडली. हरिलाल मोहनलाल गोस्वामी (५५) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी नितीन नत्थुलाल सोळंकी आणि राजू हरिलाल राठोड यांना ताब्यात घेतले.मृत हरिलाल हा मूळचा असिनपूर (लखनौ, उत्तर प्रदेश) येथील रहिवासी आहे. त्याच्या बहिणी नागपुरात राहतात. त्यांच्या ओळखीतूनच त्याच्या मुलीचे लग्न नागपुरात झाले होते. त्याची एक मुलगी सुमन (काल्पनिक नाव) मानसिकरीत्या कमकुवत आहे. लॉकडाऊनमध्ये हरिलाल मुलीच्या घरी आला होता. काचेच्या वस्तू बनवून तो विकायचा. हा व्यवसाय चांगला चालत असल्याने तो मुलीच्याच घरी राहू लागला. मात्र, छोट्याशा घरात अडचण होत असल्याने १५ दिवसांपूर्वी त्याला सुमनच्या कुटुंबीयांनी हुसकावून लावले. त्यामुळे बाजूच्याच एका पडक्या शेडमध्ये तो राहू लागला. तो सुमनलाही तेथे नेत होता. वडील असल्याने सुमनच्या कुटुंबीयांना संशय घेण्याचे कारण नव्हते. रविवारी वहिनी आणि तिच्या वडिलांना डबा देण्यासाठी सुमनचा दीर नितीन सोळंकी त्याचा मित्र राजू रविवारी रात्री शेडमध्ये आले असता त्यांना हा प्रकार पाहावयास मिळाला. यावेळी दारूच्या नशेत टुन्न असलेला हरिलाल सुमनवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करताना दिसला. ती विरोध करीत असल्याचेही नितीनने बघितले. दोघांनी हरिलालची धुलाई सुरू केली. मारहाणीत तो जमिनीवर पडला. खाली दगड असल्याने हरिलालचे डोके ठेचले गेले. तो निपचित पडल्याचे पाहून नितीन आणि राजू निघून गेले. सोमवारी सकाळी हरिलालचा मृतदेह पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना कळविले.

टॅग्स :MolestationविनयभंगMurderखूनnagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस