शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपिता व राष्ट्रसंतांचे ‘म्युरल’

By admin | Updated: July 2, 2015 03:16 IST

गांधीबाग उद्यान परिसरात महात्मा गांधी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याशी चर्चा करतानाचे भव्य म्युरल लवकरच साकारणार आहे.

मनपा अर्थसंकल्पात तरतूद : गांधीबाग उद्यानात साकारणारनागपूर : गांधीबाग उद्यान परिसरात महात्मा गांधी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याशी चर्चा करतानाचे भव्य म्युरल लवकरच साकारणार आहे. यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात ४० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. गांधीबाग उद्यानात या थोर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा साकाराव्या यासाठी राष्ट्रसंत तुकाडोजी महाराज यांचे छायाचित्रकार व सेवक गजाभाऊ भिसेकर हे २०१० सालापासून प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. भिसीकर यांनी महाराजासोबत १९४५ सालापर्यत भजन सहकारी होते. गांधीबाग उद्यानाला ऐतिहासिक वारसा आहे. सर्वत्र तणावाचे वातावरण असताना देशात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी तुकडोजी महाराज गांधीबाग येथे आठवभडाभर मुक्कामी होते. त्यानंतर शांतता प्रस्थापित होण्याला मदत झाली. तसेच महाराजांनी जगाला स्वच्छतेचा संदेश दिला. या उद्यानाला गांधीबाग नाव पडण्यामागे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे प्रयत्न आहेत. राष्ट्रसंतांनीच हे उद्यान उभारले, स्वच्छता केली आणि या उद्यानाला गांधीबाग असे नाव दिले. महात्मा गांधी यांच्या नावाने हे उद्यान आहे पण येथे त्यांचा गांधी यांचा पुतळा उभारण्यात आलेला नाही. तुकडोजी महाराज हे गांधी यांचे अनुयायी होते. ३० जानेवारी १९५३ रोजी राष्ट्रसंतांनी गांधीजींचा स्मृतिदिन नागपुरात मोठ्या प्रमाणात आयोजित केला. त्यासाठी त्यांनी तत्कालीन लेंडी तलाव परिसराची निवड केली. या परिसरात त्यावेळी खूप घाण होती आणि तेथे छोटासा तलाव होता. लोक येथे शौचासाठी येत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी, अनारोग्य पसरले होते. गांधीजी स्वच्छतेचे पुजारी होते. परिसर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवण्यासाठी त्यांनी अनेकांना प्रेरित केले. त्यांच्या याच विचाराने प्रभावित होऊन राष्ट्रसंतांनी लेंडी तलाव परिसराची निवड त्यांच्या पुण्यतिथीसाठी केली राष्ट्रसंतांनी १५०० स्वयंसेवकांच्या सहकार्याने हा तलाव परिसर स्वच्छ केला. राष्ट्रसंतांचे सहकारी आणि ज्येष्ठ छायाचित्रकार गजानन भिसेकर यांच्या पुढाकाराने दरवर्षी येथे गांधीजींचा स्मृतीदिन साजरा केला जातो. गांधीबाग नाव असूनही येथे त्यांचा पुतळा नसल्याची त्यांना खंत होती. यासाठी ते प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. (प्रतिनिधी)लवकरच कामाला सुरुवातगांधीबाग उद्यानाला ऐतिहासिक वारसा आहे. राष्ट्रसंत तुकडोची महाराज येथे शांती सप्ताह आयोजित केला होता. त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला. अशा थोर पुरुषाविषयी नवीन पिढीला ज्ञान व्हावे यासाठी हा निर्णय घेतला आहे. मनपाच्या अर्थसंकल्पात यासाठी ४० लाखाची तरतूद केली असून काही महिन्यात हे काम पूर्णत्वास जाणार आहे.-दयाशंकर तिवारीसत्तापक्ष नेते ,मनपाप्रयत्नांना यश आल्याचे समाधानगांधीबाग नाव असूनही येथे गांधीजींचा पुतळा नाही. ऐतिहासिक वारसा असलेल्या या उद्यानात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुतळा उभारला जावा यासाठी २०१० सालापासून मागणी करीत आहे. अखेर या मागणीला यश आले आहे. यात दयाशंकर तिवारी यांनीही सहकार्याची भूमिका घेतली. याचे समाधान आहे.