मुन्ना यादवची मुले परत वादात; नागपुरात काकालाच केली मारहाण

By योगेश पांडे | Updated: January 3, 2024 23:24 IST2024-01-03T23:23:28+5:302024-01-03T23:24:26+5:30

दोन्ही कुटुंबात वाद सुरू असून लहानशा कारणावरून भांडण वाढले

Munna Yadav's children are back in dispute, uncle is beaten in nagpur | मुन्ना यादवची मुले परत वादात; नागपुरात काकालाच केली मारहाण

मुन्ना यादवची मुले परत वादात; नागपुरात काकालाच केली मारहाण

नागपूर : विविध कारणांमुळे चर्चेत राहणारे भाजप नेते मुन्ना यादव यांची मुले करण व अर्जुन परत वादात सापडले आहेत. कौटुंबिक वादातून त्यांनी त्यांच्या काकालाच मारहाण केली व काकानेदेखील तसेच प्रत्युत्तर दिले. यामुळे त्यांच्या निवासस्थानाजवळ तणाव निर्माण झाला होता. प्रकरण चिघळण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी काका व पुतण्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

दोन्ही कुटुंबात वाद सुरू असून लहानशा कारणावरून भांडण वाढले. करण व अर्जुन यांची काका मनोज यादवशी वाद झाला. वादाची परिणिती अगोदर धक्काबुक्की व त्यानंतर हाणामारीत झाली. दोन्ही कुटुंबातील सदस्य आमनेसामने आले. याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला. प्रकरण धंतोली पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी जखमींना तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी मेडिकलला पाठविले. मात्र तेथून परत आल्यावर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रार न देण्याची भूमिका घेतली. परंतु यादव कुटुंबाची अगोदरची पार्श्वभूमी लक्षात घेता पोलिसांनी काका व दोन्ही पुतण्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. धंतोली पोलीस ठाण्याच्या ठाणेदार प्रभावती एकुरके यांनी या कारवाईच्या वृत्ताला दुजोरा दिला.

Web Title: Munna Yadav's children are back in dispute, uncle is beaten in nagpur