शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
3
Top Marathi News LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यूएईमध्ये; इंधनाचे दर, तुटवडा यावरील चर्चा महत्त्वाची
4
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
5
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
6
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
7
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
8
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
9
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
10
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
11
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
12
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
13
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
14
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
16
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
17
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
18
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
19
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
20
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

अंबाझरीच्या बळकटीसाठी मनपा तिजोरी खोलेना ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:52 IST

नागपूर : अंबाझरी तलावाचे चार टप्प्यात बळकटीकरण करण्याचा १९.३९ कोटींचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने तयार केला आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील ...

नागपूर : अंबाझरी तलावाचे चार टप्प्यात बळकटीकरण करण्याचा १९.३९ कोटींचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने तयार केला आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील काम सुरू करण्यासाठी ३.१४ कोटींची गरज आहे. हा निधी देण्याची महापालिकेने तयारी दर्शविली आहे. मात्र, अद्याप जलसंपदा विभागाकडे निधी वळता केलेला नाही. महापालिकेच्या समोर असलेल्या आर्थिक संकटामुळे अंबाझरी तलाव बळकटीकरणाचा प्रकल्पच संकटात सापडू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या प्रकल्पासाठी लागणाराचा खर्च महापालिका, महामेट्रो व राज्य सरकार उचलणार आहे. महामेट्रोने सुरुवातीला एक कोटी रुपये जलसंपदा विभागाकडे वळते केले आहेत. वेळेवेळी झालेल्या बैठकीत महापालिकेने निधी देण्याची तयारी दर्शविली. मात्र, प्रत्यक्षात निधी दिला नाही तर राज्य सरकारनेही अद्याप निधीसाठी पुढाकार घेतलेला नाही. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यास खूप विलंब झाला तर प्रस्तावित खर्चात वाढ होण्याचा धोका आहे. तसे झाले तर महापालिकेवर बोजा वाढेल व तो महापालिकेला परवडणारा नसेल.

१३० मीटर रिटेनिंग वॉल बांधणार

- अंबाझरी धरणाच्या स्लीप चॅनेलच्या उजव्या तिरावर दगडमिश्रीत मातीची भिंत आहे. त्यापुढे भिंतीच्या माथ्यावरील बाजूस लागूनच म्हणजे हिंगणा रोडवरील मेट्रोचे बांधकाम असल्यामुळे या भिंतीची झिज होऊ नये म्हणून १३० मीटर लांबीची रिटेनिंग वॉल बांधली जाईल.

कट ऑफ वॉलचेही बांधकाम होणार

- धरणाच्या सांडव्याच्या उजव्या बाजूस पाणी झिरपत असल्याचे पाहणीत आढळून आले होते. त्यामुळे याच्या वरील बाजूस काळी माती भरून कट ऑफ वॉलचे बांधकाम केले जाणार आहे.