शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अवैध बांधकामावर मनपा-नासुप्रचा हतोडा

By admin | Updated: May 23, 2015 02:48 IST

मनपा व नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सलग पाचव्या दिवशी शुक्रवारी अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू ठेवली.

नागपूर : मनपा व नासुप्रच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सलग पाचव्या दिवशी शुक्रवारी अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू ठेवली. मनपाच्या पथकाने संत्रा मार्केट येथील २५ दुकानासमोरील अतिक्रमण हटविले. कारवाईला विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता. दरम्यान नासुप्रच्या पथकाने पारडी भागातील सोनबानगर येथील नासुप्रच्या जागेवरील भंगार व जनावरांच्या गोठ्याचे अतिक्रमण हटविले.सकाळी ११.३० च्या सुमारास मनपाच्या पथकाने सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील गीतांजली टॉकीज जवळील यादव हॉस्पिटल व माहेश्वरी इलेक्ट्रॉनिकच्या मालकांना तळमजल्यातील गोदामासंदर्भात नोटीस बजावून प्रत्येकी २५ हजारांचा दंड ठोठावला. दोन दिवसात अतिक्रमण हटविण्याची मुदत दिली. त्यानंतर भगवाघर चौकातील सरस्वती विद्यालयाजवळील पानठेला व धार्मिक स्थळालगतचे दोन अवैध शेड हटविण्यात आले. सायंकाळी ६.३० च्या सुमारास संत्रा मार्केट परिसरात अतिक्रमण कारवाई करताना भेदभाव करीत असल्याचा पथकावर आरोप करीत लोकांनी विरोध दर्शविला. जेसीबी व अधिकाऱ्यांना घेराव करून राम मंदिराच्या वळणावर असलेल्या एका खासगी ट्रॅव्हल्सचे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. यावरून वातावरण तापले होते. त्यामुळे पोलिसाना बळाचा वापर करावा लागला.(प्रतिनिधी)नासुप्रने जागा मोकळी केलीपारडी भागात सोनबानगर मैदान येथे नासुप्रची ६ एकर जागा आहे. या जागेवर भंगार विक्रे ते व गोपालकांनी गोठा उभारला होता. येथील अतिक्रमण हटवून पथकाने साहित्य जप्त केले. तसेच साक्षी अपार्टमेंट येथील नागरिकांच्या तक्रारीवरून अपार्टमेंटच्या काही लोकांनी केलेले अनधिकृत बांधकाम हटविले. या संदर्भात १८ मे रोजी नोटीस बजावण्यात आली होती. नासुप्रचे विभागीय अधिकारी हसमुख सूचक व पथक प्रमुख वसंत कन्हेरे यांनी ही कारवाई केली. यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली.