Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 22:13 IST2026-01-01T22:11:51+5:302026-01-01T22:13:41+5:30
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.

Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. गुरुवार (ता. 01) शोध पथकाने 44 प्रकरणांची नोंद करून 27,600 रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी थुंकणे (रु. 200 दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 200 रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी/ उघडयावर मलमुत्र विर्सजन करणे (रु. 500 दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 500 रुपयांची वसुली करण्यात आली.
हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता करणे (रु. 400 दंड) या अंतर्गत 13 प्रकरणांची नोंद करून 5,200 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू. 100 दंड) या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 100 रूपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लाँजिग, बोर्डिंगचे हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 6,000 रुपयांची वसुली करण्यात आली.
वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 13 प्रकरणांची नोंद करून 10,000 रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर,मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 3,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 8 प्रकरणांची नोंद करून 1,600 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. जी. एच. इन्फ्रा यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. ग्रँड अजंता बिल्डर्स यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. धकाते सोनपापडी यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसूल करण्यात आले. आशीनगर झोन अंतर्गत योगेश शेंडे यांनी बोअरवेल खोदून रस्त्यावर चिखल आणि कचरा पसरविल्याबद्दल रु. 5,000 दंड वसूल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 04 प्रकरणांची नोंद करून रू. 30,000 दंड वसुल केला.