शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

मुंढे गेले पण विकास कामे ठप्पच! कधी बदलणार परिस्थिती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 12:07 AM

Tukaram Mundhe, NMC, Nagpur Newsस्थायी समितीने मंजुरी दिलेली व कार्यादेश झालेल्या विकास कामांना मनपाचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ब्रेक लावल्याचा आरोप सत्तापक्षासह विरोधी पक्षातील काही नगरसेवक करीत होते. मॅरेथॉन चाललेल्या सभागृहात प्रभागातील विकास कामे रोखल्यावरून नगरसेवकांनी संताप व्यक्त करून मुंढे यांना धारेवर धरले होते. परंतु मुंढे यांची बदली होऊन एक महिना उलटला पण विकास कामे तर दूरच प्रभागातील अत्यावश्यक कामेही सुरू झालेली नाहीत.

ठळक मुद्देप्रभागातील आवश्यक कामेही थांबली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्थायी समितीने मंजुरी दिलेली व कार्यादेश झालेल्या विकास कामांना मनपाचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ब्रेक लावल्याचा आरोप सत्तापक्षासह विरोधी पक्षातील काही नगरसेवक करीत होते. मॅरेथॉन चाललेल्या सभागृहात प्रभागातील विकास कामे रोखल्यावरून नगरसेवकांनी संताप व्यक्त करून मुंढे यांना धारेवर धरले होते. परंतु मुंढे यांची बदली होऊन एक महिना उलटला पण विकास कामे तर दूरच प्रभागातील अत्यावश्यक कामेही सुरू झालेली नाहीत.राज्य सरकारने जीएसटी अनुदानात १०० कोटीपर्यंत वाढ केली आहे. जुनी थकबाकी दिली. परंतु प्रभागातील गडरलाईन, चेंबर व नाल्या दुरुस्ती अशा लहानसहान कामांसाठी लाख-दोन लाखांचा निधी उपलब्ध होत नसल्याने नगरसेवक हतबल आहेत. जीएसटी अनुदान व मालमत्ता कर, पाणी कर, नगररचना शुल्क, बाजारशुल्क यासह विविध मार्गांनी होणारे उत्पन्न गृहीत धरता दर महिन्याला मनपा तिजोरीत १३० ते १३५ कोटीचा महसूल जमा होतो. तर दर महिन्याचा आस्थापना खर्च ११५ ते १२० कोटी आहे. याचा विचार करता अत्यावश्यक कामासाठी निधी उपलब्ध करण्याला कोणतीही अडचण दिसत नाही. मनपाची आर्थिक स्थिती बिकट असली तरी अत्यावश्यक कामांसाठी निधी उपलब्ध करणे शक्य नाही, इतकी वाईट निश्चितच नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नगरसेवक व्यक्त करीत आहेत.वित्तीय मंजुरी न घेताच कोट्यवधींची कामेमहापालिकेत वित्तीय मंजुरी न घेता १५० ते २०० कोटींची कामे गेल्या वर्षात करण्यात आली. कामे केल्यानंतर बिलाची मागणी केल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. असे प्रकार मनपात सर्रास होतात. दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या गडरलाईन व चेंबर दुरुस्तीसाठी लाख-दोन लाखांचा निधी मिळत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.आठ महिन्यापासून कामे ठप्पआर्थिक परिस्थितीचे कारण पुढे करून प्रभागातील अत्यावश्यक कामांसाठी मागील आठ महिन्यापासून निधी दिला जात नाही. मनपाचे आर्थिक स्रोत तेच आहेत. जीएसटी अनुदानही वाढले. असे असतानाही नगरसेवकांना प्रभागातील विकास कामांसाठी निधी मिळत नाही.संजय महाकाळकर, नगरसेवकबजेटची प्रतीक्षाऑक्टोबर सुरू झाला पण मनपाचे बजेट सादर झालेले नाही. बजेट सादर झाले असते तर तररतुदीनुसार नगरसेवकांना प्रभागातील अत्यावश्यक कामांसाठी निधी उपलब्ध झाला असता. त्यामुळे बजेटची प्रतीक्षा आहे.तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते.बजेटमध्ये आवश्यक तरतूद करूमनपाचे बजेट लवकरच सादर केले जाणार आहे. यात आवश्यक निधीची तरतूद करून विकास कामांना गती दिली जाईल. माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुधारित बजेटमध्ये आवश्यक कामासाठी निधीची तरतूदच केली नव्हती. त्यामुळे प्रभागातील लहानसहान कामे रखडली.पिंटू झलके, अध्यक्ष स्थायी समिती

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका