शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

मुंढे...कायद्याने वागा, पण लोकप्रतिनिधींचा अपमान करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 9:27 PM

मी नागपूरचा खासदार असतानाही स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामात बदल करताना मलाही विश्वासात घेतले नाही. हे वागणे योग्य नाही, अशा शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी मुंढे यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली आहे. कायद्याने वागा, पण लोकप्रतिनिधींचा अपमान करू नका, असा सल्लाही त्यांनी मुंढे यांना दिला आहे.

ठळक मुद्देनितीन गडकरींची उघड नाराजी : पालकमंत्र्यांचेही ऐकत नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकशाहीत प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधींनाही तितकेच महत्त्व आहे. प्रशासनाने लोकहिताची कामे करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलेच पाहिजे. मात्र, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे लोकप्रतिनिधींचा अपमान करतात. पालकमंत्र्यांचेही ऐकत नाहीत. मी नागपूरचा खासदार असतानाही स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामात बदल करताना मलाही विश्वासात घेतले नाही. हे वागणे योग्य नाही, अशा शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी मुंढे यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली आहे. कायद्याने वागा, पण लोकप्रतिनिधींचा अपमान करू नका, असा सल्लाही त्यांनी मुंढे यांना दिला आहे.गेली पाच दिवस महापालिकेच्या सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी मुंढे यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूभीवर ‘लोकमत’शी बोलताना गडकरी म्हणाले, मुंढे जर जनहितार्थ कठोर निर्णय घेत असतील, ते कायद्यानुसार योग्य असतील तर त्याला आमचा पाठिंबा आहे. मात्र, लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता एकतर्फी कारभार करणे योग्य नाही. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, नगरसेवक हे व्यक्तिगत नाही तर जनतेचे प्रतिनिधी आहेत. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे येथे रुजू झाल्यानंतर १५ दिवस महापौरांना भेटले नाहीत. महापौरांचा अपमान करणे म्हणजे या शहरातील जनतेचा अपमान करण्यासारखे आहे. नगरसेवकांना भेटत नाहीत. काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना तीन-तीन तास बाहेर बसवून ठेवतात. आमदारांशी चांगले वागत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांच्या खूप तक्रारी आहेत.मी नागपूरचा खासदार आहे. स्मार्ट सिटीचा प्रकल्प मी स्वत: आणला. केंद्र सरकारचे पैसे आहेत. त्या प्रकल्पात मनाला वाटेल तसा बदल करताना या शहराचा खासदार म्हणून मुंढे हे माझ्याशी एकही वेळा बोलले नाहीत. ते नगरसेवक, आमदार, खासदार कुणालाही विचारत नाहीत. इतकेच काय तर पालकमंत्री नितीन राऊत यांच्या बैठकीलाही ते उपस्थित नव्हते. असे काही चालत नाही. शेवटी लोकशाहीमध्ये प्रशासन व लोकप्रतिनिधीही महत्त्वाचे आहेत. लोकप्रतिनिधींना अशी अपमानजनक वागणूक देणे चांगले नाही. जे घडतंय ते दु:खद आहे. या सर्व गोष्टींकडे माझे बारकाईने लक्ष आहे, असा सूचक इशाराही गडकरी यांनी दिला आहे.स्मार्ट सिटी प्रकल्पात मलाही विश्वासात घेतले नाहीमी शहराचा खासदार असताना कुठल्याही मोठ्या प्रकल्पाबाबतचे निर्णय घेताना मला साधी विचारणाही झाली नाही. स्मार्ट सिटीचा प्रकल्प नागपूरमधील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. रामनाथ सोनवणेसारखे चांगले अधिकारी मुंढे यांना कंटाळून हा प्रकल्प सोडून गेले. मुंढे यांनी बँकेमध्ये जाऊन अकाऊंटचे नाव बदलवून पैसे काढून टाकले. हे सगळं करताना त्यांनी परवानगी घ्यायला पाहिजे होती. खासदार म्हणून माझ्याशी चर्चा करायला हवी होती. अधिकारी असले तरी लोकशाहीमध्ये असा कारभार चालत नाही. समन्वयाने काम केले पाहिजे. याची गंभीर दखल आपण घेतल्याचे गडकरी यांनी सांगितले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीtukaram mundheतुकाराम मुंढे