शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मुंडन व रास्तारोको

By admin | Updated: June 5, 2017 17:55 IST

संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला यवतमाळ जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला यवतमाळ जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यवतमाळ शहरात शेतकऱ्यांनी मुंडन करून रस्त्यावर भाजीपाला फेकत शासनाचा निषेध केला. जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्ता रोको करण्यात आल्याने वाहतूक ठप्प झाली होती.यवतमाळ शहरात शेतकरी न्याय हक्क समितीच्या नेतृत्वात बंदचे आवाहन करण्यात आले होते. सोमवारी सकाळी मोर्चा काढून व्यावसायिकांना प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरापुढे शासनाचा निषेध करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. तर हुतात्मा चौकात शेतकऱ्यांनी मुंडन केले. तसेच आर्णी नाका परिसरात रस्त्यावर भाजीपाला फेकून निषेध केला. नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील अर्जुना येथे शेतकऱ्यांनी सरण रचून शासनाचा अभिनव निषेध केला. शेतकरी-वारकरी संघटनेने केलेल्या या आंदोलनाने वाहतूक ठप्प झाली होती. भांबराजा येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर लाकडाचे ओंडके आणि बैल बांधून रस्ता रोको केला. यामुळे वाहतूक ठप्प होऊन तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यवतमाळ तालुक्यातील कोळंबी फाट्यावरही रस्ता रोको करण्यात आला. महागाव तालुक्यातील हिवरासंगम येथे शेतकऱ्यांनी धरणे दिले. उमरखेड, नेर, बाभूळगाव, कळंब, राळेगाव या तालुक्यातही शेतकरी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठेत सोमवारी शुकशुकाट दिसत होता. आंदोलनादरम्यान जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडली नाही. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.