लॉकडाऊनच्या काळात बँकेत जाताय? .. मग या सूचनांचे पालन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 19:04 IST2020-03-29T19:04:11+5:302020-03-29T19:04:43+5:30
बँकेत वा एटीएम केंद्रात जाताना ग्राहकांनी पाळावयाच्या सूचनांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे.

लॉकडाऊनच्या काळात बँकेत जाताय? .. मग या सूचनांचे पालन करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: बँकेत वा एटीएम केंद्रात जाताना ग्राहकांनी पाळावयाच्या सूचनांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. यात दिलेल्या सूचना अशा आहेत. जर तुम्ही एटीएममधून पेसे काढायला जात आहात तर तुम्ही पिन नंबर टाकण्यापूर्वी सोबत नेलेल्या टिश्यू पेपरला आपली बोटे स्वच्छ पुसून घ्या. नंतर पिन टाका. बँकेत गेल्यावर आतमध्ये फक्त चारच व्यक्तींना सोडण्यात येणार आहे. त्यातीलएका वेळी एकच व्यक्ती मॅनेजरच्या केबिनमध्ये जाऊ शकते. कुठलीही स्लीप भरायची झाल्यास स्वत:चा पेन असणे आवश्यक आहे. नोटा मोजताना आपले बोट तोंडात न घालता, बँकेने उपलब्ध करून दिलेल्या ओल्या स्पंजवर टेकवा आणि मगच नोटा मोजा. शक्यतो बँकेत जाण्याचे टाळा. रक्कम काढणे वा भरणे या बाबी एटीएममध्ये केल्या जाऊ शकतात. त्याचा अधिक वापर करावा असे सांगण्यात आले आहे.