शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकाने सुरू करण्यासाठी हालचाली

By admin | Updated: April 7, 2017 02:55 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नागपूर जिल्ह्यात बंद झालेले बार आणि दुकाने पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली

मार्गांचे वर्गीकरण सुरू : १७ बार व दुकानांना फायदानागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नागपूर जिल्ह्यात बंद झालेले बार आणि दुकाने पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली वरिष्ठस्तरावर सुरू झाल्या आहेत. त्यासाठी दारू विक्रेते असोसिएशनच्या बैठका सुरू झाल्या आहेत. दुकाने सुरू करण्यासाठी शहरातून जाणारे राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वर्गीकृत करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.१५ डिसेंबर २०१६ नंतर राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वर्गीकृत करता येणार नाही, असेही निकालात स्पष्ट केले आहे. त्यानंतरही राज्यातील काही जिल्ह्यातील महामार्ग स्थानिक संस्थांकडे वर्गीकृत करून शासनाने मद्यसम्राटांना फायदा करून दिला आहे. जळगाव, धुळे आणि यवतमाळ येथील बंद झालेली दुकाने पुन्हा सुरू झाली आहेत. याशिवाय नागपूर-काटोल-जलालखेडा राज्य महामार्ग २०१५ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वर्गीकृत केल्याचा फायदा १७ बार आणि दारूच्या दुकानांना झाला आहे. अशाप्रकारे नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुके आणि शहरातील बार आणि दारूची दुकाने पुन्हा सुरू करण्यासासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग स्थानिक संस्थांकडे वर्गीकृत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण त्यावर शिक्कामोर्तब होणार नाही, असे दारू विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)तब्बल ७५ टक्के दुकाने बंदसर्वोच्च न्यायालयाचा फटका नागपूर जिल्ह्यातील ८७१ दुकानांना बसला आहे. परमिट रूम आणि बारचे स्थलांतरण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी करणे शक्य नाही, पण दारूची दुकाने हलविणे शक्य आहे. त्यासाठी नागरिकांना सजग राहून स्थलांतरित होणाऱ्या दुकानाविरुद्ध आंदोलन करण्याची गरज आहे. यात महिला मंडळाची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. बार व दुकाने बंद झाल्यामुळे शासनाला परवाना शुल्क आणि विक्रीकराला मुकावे मुकावे लागेल. ही बाब खरी असली तरीही अधिकाऱ्यांची कमाई बंद होणार आहे. त्यामुळेच नेत्यांना हाताशी धरून दारू विक्रेत्यांसोबत संगनमत करून शासकीय अधिकारी दुकाने सुरू करण्याचा जोरकस प्रयत्न करीत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. आडमार्गाने दारू दुकान सुरू केल्यास आंदोलन - सुलेखा कुंभारेराष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गवरील ५०० मीटरच्या आतील दारू दुकाने बंद करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महिला व सर्वसामान्य जनतेच्या हिताचा आहे. ज्याप्रमाणे गुजरात व बिहार राज्यात दारुबंदी घोषित करण्यात आली त्याच धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रात दारुबंदी घोषित करावी, असे आवाहन बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संस्थापक अध्यक्षा माजी मंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी केले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध जाऊन आडमार्गाने दारू दुकाने सुरू केल्यास तीव्र लढा उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दारूमुळे अनेक गरीब परिवार उद्ध्वस्त झाले असून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे या गरीब जनतेस विशेषकरून महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु राज्य शासनाद्वारे महसूल बुडण्याचा धोका समोर करून दारू दुकाने पुन्हा चालू करण्यासाठी पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. शासनाने महसूल प्राप्तीकरिता इतर योजनांचा अवलंब करावा. मात्र सामान्य माणसाच्या जीवनासोबत खेळून महसूल प्राप्त करणे हे कल्याणकारी राज्याचे प्रतीक नाही, असेही कुंभारे यांनी म्हटले आहे.