नागपूर विभागासाठी दावोसमध्ये पाच लाख ९२ हजार ७४६ कोटींचे सामंजस्य करार; ४७ हजार रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 12:27 IST2026-02-06T12:26:39+5:302026-02-06T12:27:51+5:30

Nagpur : दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये नागपूर विभागासाठी पाच लाख ९२ हजार ७४६ कोटी रुपयाचे गुंतवणूक करार झाले आहेत. विभागात विविध ११ कंपन्यांसोबत झालेल्या या करारामुळे ४७ हजार रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे.

MoU signed for Nagpur division in Davos for Rs 5 lakh 92 thousand 746 crores; Target of creating 47 thousand jobs | नागपूर विभागासाठी दावोसमध्ये पाच लाख ९२ हजार ७४६ कोटींचे सामंजस्य करार; ४७ हजार रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट

MoU signed for Nagpur division in Davos for Rs 5 lakh 92 thousand 746 crores; Target of creating 47 thousand jobs

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये नागपूर विभागासाठी पाच लाख ९२ हजार ७४६ कोटी रुपयाचे गुंतवणूक करार झाले आहेत. विभागात विविध ११ कंपन्यांसोबत झालेल्या या करारामुळे ४७ हजार रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रासह नागपूर विभागात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे. यामुळे औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

नागपूर विभागात निर्माण होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. विभागात औद्योगिक, तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, ग्रीन एनर्जी, सोलर, अन्न आणि प्रक्रिया उद्योग, स्टील मेटल, आदी क्षेत्रात ही गुंतवणूक होणार आहे. या उद्योगांसाठी २३ हजार २७६ एकर जमिनीची आवश्यकता आहे. त्यापैकी १ हजार ४६६ एकर जमीन उद्योगांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. सामंजस्य करारामध्ये जेएसडब्ल्यू ग्रुप स्टील, एनर्जी, ग्रीन मोबिलिटी, सिमेंट, आदी क्षेत्रात तीन लाख कोटींची गुंतवणूक करणार असून, या उद्योग समूहांमुळे १० हजार रोजगार निर्मिती होणार आहे. या संदर्भातील ऑफर लेटर निर्गमित करण्यात आले आहे. हॉयझिरो या उद्योग समूहाने ग्रीन एनर्जीसाठी १६ हजार कोटींचे गुंतवणूक करार केले आहे.

या उद्योग समूहामुळे १० हजार रोजगार निर्मिती होणार आहे. वर्धमान लिथियमतर्फे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात ४२ हजार ५३५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले असून, ५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. वारी एनर्जी ग्रीन एनर्जीमध्ये ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार असून, या उद्योगात ७ हजार ५०० रोजगार निर्मिती होणार आहे. ग्रीन एनर्जी क्षेत्रात पॉवरिंग ऊर्जा या समूहातर्फे ६० हजार २९९ कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले असून, सुमारे ८ हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

अशी येणार गुंतवणूक

  • ऑटोमिटिव्ह आणि ईव्ही या क्षेत्रात सिएट उद्योग समूहातर्फे ५०० कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे करार करण्यात आले असून, ५०० रोजगार निर्मिती होणार आहे. एमएसएन होल्डिंग या उद्योग समूहातर्फे सोलर क्षेत्रात १५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून, ५०० रोजगार निर्मिती होणार आहे.
  • रिलायन्स कन्झूमर प्रोडक्ट लिमिटेड हा उद्योग समूह फ्रूड अँड ब्रेव्हरेज क्षेत्रात १ हजार ५१३ कोटींची गुंतवणूक करणार असून, काटोल येथे २ हजार मनुष्यबळ निर्माण होणार आहे.
  • चंद्रपूर येथे ग्रेटा एनर्जी हा उद्योग समूह स्टील अँड मेटल या क्षेत्रात १० हजार ३१९ कोटींची गुंतवणूक करणार असून, ३ हजार २०० रोजगार निर्मिती होणार आहे.
  • गडचिरोली जिल्ह्यात लॉईड मेटल अँड एनर्जी हा उद्योग समूह १६ हजार ५८० कोटींची गुंतवणूक करणार आहे. येथे ३ हजार ५०० रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे. गडचिरोली येथे जेएसडब्ल्यू या उद्योग समूहाने स्टील क्षेत्रात एक लाख कोटीच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले आहे.

Web Title : नागपुर विभाग के लिए दावोस में 5.92 लाख करोड़ के MoU, रोजगार लक्ष्य।

Web Summary : दावोस में नागपुर विभाग ने 5.92 लाख करोड़ रुपये का निवेश हासिल किया, जिसका लक्ष्य 47,000 नौकरियां हैं। ग्यारह कंपनियां इस्पात, ऊर्जा और इलेक्ट्रॉनिक्स जैसे क्षेत्रों में निवेश करेंगी। जेएसडब्ल्यू समूह 3 लाख करोड़ रुपये के निवेश के साथ आगे है। बुनियादी ढांचा विकास निवेशकों को आकर्षित करता है, जिससे क्षेत्र में औद्योगिक विकास को बढ़ावा मिलता है।

Web Title : Nagpur Division secures ₹5.92 Lakh Crore MoUs in Davos, jobs target.

Web Summary : Nagpur Division secured ₹5.92 Lakh Crore investment at Davos, aiming for 47,000 jobs. Eleven companies will invest in sectors like steel, energy and electronics. JSW Group leads with ₹3 Lakh Crore investment. Infrastructure development attracts investors, boosting industrial growth across the region.