मदर तेरेसा यांना ‘संत’ पद, नागपुरात जल्लोष

By Admin | Updated: September 5, 2016 02:52 IST2016-09-05T02:52:28+5:302016-09-05T02:52:28+5:30

आधार नसलेल्या दीनदु:खितांसाठी कार्य क रणाऱ्या मदर टेरेसा यांना संतपद बहाल करण्यात आले.

Mother Teresa's 'Sant' post, Nagpur meeting | मदर तेरेसा यांना ‘संत’ पद, नागपुरात जल्लोष

मदर तेरेसा यांना ‘संत’ पद, नागपुरात जल्लोष

शांतिभवनात मिठाई वाटून आनंद साजरा : टीव्हीवर पाहिला संतपद बहालीचा सोहळा
नागपूर : आधार नसलेल्या दीनदु:खितांसाठी कार्य क रणाऱ्या मदर टेरेसा यांना संतपद बहाल करण्यात आले. व्हेटिकन सिटी, रोम येथे झालेल्या भव्य सोहळ््यात पोप फ्रान्सिस यांनी त्यांना मरणोत्तर संत ही उपाधी बहाल केली. नागपुरातही संत मदर टेरेसा यांच्या चाहत्यांनी उत्सव साजरा केला. अपंग, मतिमंद, वृद्धांचा सांभाळ करणाऱ्या शांतिभवन येथील केंद्रात मिठाई वाटून हा आनंद व्यक्त क रण्यात आला.
मदर टेरेसा यांच्या कोलकाता येथील मुख्य केंद्राशी संलग्नित असलेल्या शांतिभवन येथे रविवारी सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. येथे सेवाकार्य करणाऱ्या सिस्टर आणि आश्रयात असलेले निराधार व्हेटिकन सिटी येथे होणारा सोहळा पाहण्यासाठी दुपारपासून टीव्हीसमोर बसले होते. दुपारी २ नंतर पोप यांनी संतपद बहाल करण्याची घोषणा करताच सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद तरळला. शांतिभवनच्या आवारात सर्वजण गोळा झाले आणि एकमेकांना मिठाई भरवण्यात आली. सोबतच ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून मदर टेरेसा यांच्या संतपदाचा आनंद व्यक्त करण्यात आला. शांतिभवन येथे आश्रयात असलेले आजारी, अपंग, मतिमंद, वृद्धांसमवेत हा आनंद साजरा करण्यात आला. याप्रसंगी शंतिभवनच्या प्रमुख रेव्हरन सिस्टर जोसिका, सिस्टर डॅनियल, फिलीप जोसेफ, ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव, नेल्सन फ्रान्सिस, चार्ल्स फ्रान्सिस, क्लेमंड जोसेफ, राजेश क्रॉस, संजय फ्रान्सिस, सिल्वेस्टर राव, जॉन जोसेफ, जॉन झेव्हियर, माजी नगरसेवक राजेश माटे आदी उपस्थित होते.
मदर टेरेसा यांचे कार्य अवघ्या जगाला प्रेरणा देणारे आहे. दीनदुबळ््यांमध्ये देव असल्याचा विचार करत त्यांनी आजीवन अशा वंचित घटकांची सेवा केली. आजारी, आधार नसलेले, उकिरड्यावर जगणाऱ्यांना आश्रमात आणून त्यांना मायेचा आधार दिला. जीवनाच्या शेवटपर्यंत त्यांनी हे कार्य केले. त्या हयात नसतानाही त्यांचे कार्य देशभरात सुरू आहे. त्यातीलच एक केंद्र म्हणजे शांतिभवन. त्यामुळे ईसाई धर्माचे सर्वोच्च आस्था केंद्र व्हेटिकन सिटी येथे पोप यांनी मदर टेरेसा यांना संतपद बहाल करण्याची घोषणा केल्याने सेवेचे व्रत घेऊन कार्य करणाऱ्यांचा आनंद अलौकिक असा आहे. मदर टेरेसा १९९० साली एका दिवसासाठी नागपूरला आल्या होत्या व त्यांनी शांतिभवनला भेट दिली होती. त्या दिवसाच्या आठवणी ताज्या झाल्याच्या भावना शांतिभवन येथे सेवा देणाऱ्यांनी व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Mother Teresa's 'Sant' post, Nagpur meeting