शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात सात हजारांहून अधिक प्रसुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST

सुमेध वाघमारे नागपूर : सन्मानपूर्वक प्रसूती आणि अशा प्रसूतींसाठी सर्व प्रकारची अपेक्षित गुणवत्तापूर्ण शुश्रुषा मिळणे हा प्रत्येक मातेचा मूलभूत ...

सुमेध वाघमारे

नागपूर : सन्मानपूर्वक प्रसूती आणि अशा प्रसूतींसाठी सर्व प्रकारची अपेक्षित गुणवत्तापूर्ण शुश्रुषा मिळणे हा प्रत्येक मातेचा मूलभूत हक्क आहे. कोरोनाच्या कठीण काळात हा हक्क अबाधित ठेवणे हे एक आव्हान होते; परंतु डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाने तसे नियोजन केले. यामुळेच मार्च ते डिसेंबर या काळात इतर रुग्णालयांच्या तुलनेत सर्वाधिक ७,६७७ प्रसूती यशस्वी केल्या. यात ३,६१४ नॉर्मल, तर ४,०६३ सीझर होत्या.

कोरोनाच्या प्रादुर्भावाला मार्च महिन्यापासून सुरुवात होताच शासकीयसह खासगी हॉस्पिटलमधील चित्रच बदलले. प्रसूतीपूर्वी कोरोना चाचणीची अट घालण्यात आल्याने गर्भवतींना धावाधाव करण्याची वेळ आली. यातच अनेक खासगी हॉस्पिटलने सोयी नसल्याचे कारण देऊन प्रसूतीसाठी हात वर केले. ज्यांनी होकार दिला त्यांनी कोरोना चाचणीच्या निगेटिव्ह अहवालाची अट टाकली. काहींनी पॉझिटिव्ह मातेचा प्रसूतीची रक्कम दुप्पटीने वाढविली. मेयो, मेडिकलमध्ये पॉझिटिव्ह गर्भवतींची सोय करण्यात आल्याने निगेटिव्ह अहवाल आलेल्या मातांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. परिणामी, डागा रुग्णालयाची जबाबदारी वाढली. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवेकर यांनी त्या पद्धतीचे नियोजन केले. याला रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. या सर्वांनी कोरोनाशी लढा देत ७,६७७ प्रसूती केल्या. विशेष म्हणजे, यात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या १७ प्रसूतींचाही समावेश आहे.

-जुलै महिन्यापासून वाढला रुग्णालयावर विश्वास

डागा रुग्णालयात महिन्याकाठी ८०० ते १००० दरम्यान होणाऱ्या प्रसूती कोरोनाचा काळात कमी झाल्या. मे महिन्यात तर प्रसूतीची संख्या ६००च्या खाली होती. मात्र, डागा रुग्णालयातील नियोजनावर गर्भवतींचा विश्वास वाढला. यामुळे जुलै महिन्यापासून प्रसूतींची संख्या वाढू लागली. या महिन्यात ६४४, ऑगस्ट महिन्यात ७५५, सप्टेंबर महिन्यात ७३४, ऑक्टोबर महिन्यात ८९५, नोव्हेंबर महिन्यात १०२८, तर डिसेंबर महिन्यात ९०४ प्रसूती झाल्या.

- ५१ टक्केच सीझर

जानेवारी ते नोव्हेंबर २०२० या काळात ९४५७ प्रसूतीमधून ४५५४ नॉर्मल, तर ४९०३ सीझर झाले. एकूण प्रसूतीच्या तुलनेत ५१.८४ टक्के सीझर झाले. तज्ज्ञाच्या मते, नॉर्मल प्रसूतीमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा अधिक धोका असतो, असे असताना डागा रुग्णालयातील डॉक्टरांनी नॉर्मल प्रसूतीला प्राधान्य दिल्याचे दिसून येते.

-कोरोना पॉझिटिव्ह गर्भवतींचीही केली प्रसूती

कोरोनाशी लढा देत, सुरक्षिततेची आवश्यक उपाययोजना हाती घेत अधिक जबाबदारीने प्रसूती करण्यात आल्या. यामुळे महिलांचा रुग्णालयावरील विश्वास वाढला. ऐनवेळी प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती पॉझिटिव्ह असतानाही त्यांची प्रसूती करण्यात आली. यामुळे संबंधित डॉक्टरांपासून ते कर्मचाऱ्यांवर क्वारंटाईनची वेळ आली. अशा मातांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला. त्यांच्यापासून नवजात शिशूला लागण होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली. रुग्णालयाचे हे यश सर्वांचे आहे.

-डॉ. माधुरी थोरात

अतिरिक्त, जिल्हा शल्यचिकित्सक

महिना एकूण प्रसूती

मार्च ८५०

एप्रिल ६७५

मे ५५१

जून ६४१

जुलै ६४४

ऑगस्ट ७५५

सप्टेंबर ७३४

ऑक्टोबर ८९५

नोव्हेंबर १०२८

डिसेंबर ९०४