शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारपासून सर्व दुकाने रात्री ८ पर्यंत खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट, ऑक्सिजन बेडची उपलब्धता व दैनंदिन रुग्णांची परिस्थिती लक्षात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट, ऑक्सिजन बेडची उपलब्धता व दैनंदिन रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता सुधारित सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. नागपूर अद्यापही पहिल्या श्रेणीमध्ये समाविष्ट आहे. तथापि शुक्रवारी झालेल्या पुनर्विलोकन बैठकीमध्ये सोमवार, २१ जूनपासून नागपूर शहर व जिल्ह्यात रात्री आठ वाजेपर्यंत अत्यावश्यक व आवश्यक सेवेतील दुकाने व आस्थापना सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यापूर्वी पाच वाजेपर्यंत सुरू असणारी दुकाने आता आठ वाजेपर्यंत सुरू राहतील.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी या संदर्भातील सुधारित आदेश जाहीर केले आहेत. यापूर्वी १२ जूनला जारी केलेल्या आदेशामध्ये शिथिलता देत शहरातील आस्थापना आता आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आल्या आहेत.

२८ जूनपर्यंत आदेश

नवे आदेश सोमवार २१ जून सकाळी ७ वाजतापासून तर २८ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहतील. त्यानंतर पुन्हा आढावा घेऊन परिस्थितीनुसार निर्बंध आणखी शिथिल करायचे की कडक करायचे, याचा निर्णय घेतला जाईल.

जमावबंदी कायम

जिल्ह्यात अद्यापही जमाव बंदी कायम आहे. त्यामुळे निर्बंध कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा अधिक नागरिकांनी एकत्रित येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच कोरोना संपला नसून नागरिकांनी आवश्यकतेनुसार घराबाहेर पडावे तसेच गर्दी करू नये व कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लग्न समारंभात १०० लोकांना परवानगी

लग्न समारंभासाठी १०० लोकांनाच परवानगी राहील. मंगल कार्यालयात लग्न समारंभ असेल तर ५० टक्के क्षमतेने करावे लागले. परंतु ही ५० टक्के क्षमताही १०० व्यक्तींच्या वर नसावी. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमही ५० टक्के क्षमतेने करता येतील. अंत्यसंस्कारासाठी पूर्वीप्रमाणेच ५० लोकांना परवानगी राहील.

शाळा-महाविद्यालये व धार्मिक स्थळे बंदच

शाळा, कॉलेजेस बंदच राहतील. आदेशात हे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑनलाईन क्लासेस, प्रॅक्टिकल परीक्षा आणि प्रशासकीय कामासाठी शाळा-महाविद्यालये सुरू ठेवता येतील. धार्मिक स्थळेही बंद राहतील. दुसरीकडे कोचिंग क्लासेसला परवानगी देण्यात आली आहे. तसेच कौशल्य विकास क्लासेस, टायपिंग इन्स्टिट्यूट, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट व आरोग्यविषयक प्रशिक्षण संस्था ५० टक्के क्षमतेमध्ये किंवा वीस विद्यार्थ्यांपर्यंत नियमित सुरू ठेवता येतील.

आंतरजिल्हा प्रवासास परवानगी

आंतरजिल्हा प्रवासास परवानगी देण्यात आली आहे. खासगी कार, टॅक्सी, बस, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुरू असतील. मात्र ज्या जिल्ह्यात ई-पास आवश्यक असेल तिथे स्थानिक नियम पाळावे लागतील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

सोमवारपासून असे असतील निर्बंध

- सर्व प्रकारची दुकाने व आस्थापने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू.

- शहरातील मॉल, चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स नाट्यगृह, ५० टक्के क्षमतेमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल.

- उपाहारगृहे ५० टक्के क्षमतेत रात्री ११ पर्यंत सुरू ठेवता येतील.

- लोकल ट्रेन, मेट्रो नियमित सुरू राहतील.

- सार्वजनिक ठिकाण, पटांगण, वाॅकिंग, सायकलिंगसाठी सकाळी पाच ते नऊ व सायंकाळी पाच ते नऊ परवानगी आहे.

- खासगी कार्यालय व शासकीय कार्यालये नियमित सुरू.

- सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हॉलच्या पन्नास टक्के उपस्थितीला परवानगी. मात्र ही क्षमता १०० व्यक्तींपर्यंत मर्यादित.

- अंत्यसंस्काराला अधिकाधिक ५० लोकांना उपस्थित राहता येईल.

- बैठका, निवडणुका, स्थानिक प्रशासन व स्थायी समिती बैठक सहकारी मंडळ ऑनलाईन घेता येतील.

- बांधकाम करण्यास परवानगी आहे.

- कृषी, शेतीच्या सर्व कामांना रात्री ८ वाजेपर्यंत परवानगी आहे.

- ई-कॉमर्स साहित्य व सेवा पुरवठा नियमित.

- जिम, सलून, सौंदर्य केंद्र, स्पा, वेलनेस केंद्र रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतील.

- सार्वजनिक वाहतूक, मालवाहतुकीला परवानगी असेल. मात्र बसमध्ये उभे राहून प्रवासास निर्बंध.

- सर्व उद्योग-कारखाने नियमितपणे सुरू

- सर्व जलतरण तलाव बंद असतील-

- अम्युजमेंट पार्क रात्री ८ पर्यंत उघडे असतील

- बोटिंगला नियमित परवानगी आहे.

- वाचनालय वाचन कक्ष, अभ्यास कक्ष रात्री ८ वाजेपर्यंत सुरू असतील.

- आधार कार्ड सेंटर नियमितपणे सुरू असेल

- शॉपिंग मॉलमधील रेस्टॉरंट आणि बार ५० टक्के क्षमतेमध्ये रात्री ११ पर्यंत.

- गोरेवाडा जंगल सफारी रात्री आठ पर्यंत सुरू असेल

- शासकीय, निमशासकीय प्रशिक्षण संस्था नियमितपणे सुरू असतील.

- कोचिंग क्लासेस ५० टक्के क्षमतेत, मात्र २० विद्यार्थ्यांपेक्षा अधिक विद्यार्थी क्लासमध्ये बसवता येणार नाहीत.

- खेळाची मैदाने, आउटडोअर व इनडोअर स्टेडियम सकाळी ५ ते ९ व सायंकाळी ५ ते ९ सुरू असतील.

- चित्रपट, सिरियल व व्यावसायिक चित्रीकरण (शूटिंग) नियमितपणे करता येईल.