नागपुरात महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 23:09 IST2018-08-22T23:08:16+5:302018-08-22T23:09:05+5:30
खासगी फायनान्स कंपनीत कार्यरत एका महिला कर्मचाऱ्याचा वरिष्ठ अधिकाऱ्याने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अडीच महिन्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पीडित ४० वर्षीय महिला २०१७ पासून धरमपेठ येथील एका खासगी फायनान्स कंपनीत काम करीत होती.

नागपुरात महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खासगी फायनान्स कंपनीत कार्यरत एका महिला कर्मचाऱ्याचा वरिष्ठ अधिकाऱ्याने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अडीच महिन्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पीडित ४० वर्षीय महिला २०१७ पासून धरमपेठ येथील एका खासगी फायनान्स कंपनीत काम करीत होती.
अभिजित राहाटे (३५) असे आरोपीचे नाव आहे. महिलेच्या तक्रारीनुसार अभिजित तिच्याशी द्विअर्थी भाषेत बोलत होता. वरिष्ठ असल्याने ती सर्व सहन करीत होती. मार्च महिन्यात अभिजितने तिला आणि इतर कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्ष समाप्तीचे कारण सांगून सुटीच्या दिवशीही कामावर बोलावले. तिथे तिला एकटी पाहून तिच्याशी आपत्तीजनक व्यवहार केला. यानंतर अभिजित तिला नियमित त्रास देऊ लागला. महिलेनुसार अभिजित तिच्याशी इतरांसमोरही असभ्य वर्तणूक करू लागला. विरोध केल्यास नोकरी सोडण्याचा सल्ला दिला. पीडित महिलेने याबाबत आपल्या मित्र-मैत्रिणींना सांगितले. नाईलाजास्तव मे मध्ये तिने नोकरीचा राजीनामा दिला, तसेच याबाबत सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. कर्यालयातील इतर कर्मचारी, महिला सहकाºयांना विचारपूस केली. परंतु त्यांनी कुठलीही ठोस माहिती दिली नाही. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंग आणि शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला तसेच आरोपीला ताब्यात घेतले. अभिजितने मात्र त्याच्यावरील आरोप स्पष्टपणे नाकारले आहेत.
घरात घुसून विनयभंग व मारहाण
जरीपटका येथे एका तरुणीच्या घरात घुसून विनयभंग व मारहाण करण्यात आली. गड्डीगोदाम येथील ३५ वर्षीय सचिन गुणवंतराव धोंगळे हा मंगळवारी रात्री २० वर्षीय तरुणीच्या घरी आला. दरवाजा बंद करून तिच्याशी आपत्तीजनक व्यवहार करू लागला. विरोध केला असता मारहाण केली. जरीपटका पोलिसांनी विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली.