महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:07 IST2021-07-26T04:07:56+5:302021-07-26T04:07:56+5:30

सावनेर : आराेपीने घरासमाेर राहणाऱ्या महिलेचा विनयभंग केला. ही घटना सावनेर शहरातील स्वराज टाऊन येथे नुकतीच उघडकीस आली. दरम्यान ...

Molestation of a woman | महिलेचा विनयभंग

महिलेचा विनयभंग

सावनेर : आराेपीने घरासमाेर राहणाऱ्या महिलेचा विनयभंग केला. ही घटना सावनेर शहरातील स्वराज टाऊन येथे नुकतीच उघडकीस आली. दरम्यान पाेलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे.

पीडित महिला एकटी असल्याचे पाहून आराेपी मुकेश चंदनकर (रा. प्रमाेद भुरके यांच्या घरी, स्वराज टाऊन, सावनेर) याने अश्लील इशारे करीत तिला लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. शिवाय आराेपीने यापूर्वीही तिला एकटी पाहून एकटक पाहणे व अश्लील इशारे करीत हाेता. दरम्यान, पीडितेने पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी भादंवि कलम ३५४ (ड) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक प्रियंका गेडाम करीत आहेत.

Web Title: Molestation of a woman