शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
9
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
10
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
11
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
12
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
13
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
14
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
15
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
16
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

निश्चयाने मोदींनी गाठले मौदा

By admin | Published: August 22, 2014 1:37 AM

प्रतिकूल हवामानामुळे एटीसी, पायलट यांनी पंतप्रधानांना मौदा येथे घेऊन जाणारे हेलिकॉप्टर उडविण्यास नकार दिला. धुंवाधार पाऊस ऐकायला तयार नव्हता. शेवटी सुरक्षा अधिकाऱ्यांनी (एसपीजी)

प्राईम मिनिस्टर बाय रोड : मोदींना मौद्याला न्यायचे कसे? नरेश डोंगरे - नागपूर प्रतिकूल हवामानामुळे एटीसी, पायलट यांनी पंतप्रधानांना मौदा येथे घेऊन जाणारे हेलिकॉप्टर उडविण्यास नकार दिला. धुंवाधार पाऊस ऐकायला तयार नव्हता. शेवटी सुरक्षा अधिकाऱ्यांनी (एसपीजी) पंतप्रधानांना बाय रोड मौद्याला नेण्याचे ठरवले. एसपीजींच्या या निर्णयाने नागपूर-महाराष्ट्राची सुरक्षा यंत्रणा हादरली. कारण मौद्याच्या कार्यक्रमस्थळापासून पाच किलोमीटरचा रस्ता गर्दीने फुलला होता. अशास्थितीत पंतप्रधानांना रस्त्यावरून नेणे म्हणजे ‘हाय रिस्क’! ती पत्करण्याची पोलीस यंत्रणेची तयारी नव्हती. वरिष्ठांचे मतभेद होण्यापर्यंतची वेळ आली अन् ... पाऊस ऐकला (थांबला!). वातावरण अनुकूल झाले. त्यामुळे पंतप्रधानांना घेऊन हेलिकॉप्टरचा ताफा मौद्याकडे रवाना झाला. मात्र, तो दीड-पावणे दोन तासांचा कालावधी अवघ्या सुरक्षा यंत्रणेची धाकधुक वाढवणारा ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी नियोजित वेळेनुसार विशेष विमानाने रांची (झारखंड) येथून आज दुपारी ३.०५ वाजता नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. पंतप्रधानांचे विमान धावपट्टीवर उतरत असतानाच धुंवाधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे सुरक्षा अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना विमानतळावरील व्हीआयपी लाऊंजमध्ये नेण्यात आले. तेथेच राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अतिमहत्त्वांचे व्यक्ती मा. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी यांनाही विमानतळावरून नेण्यात आले. दरम्यान, पंतप्रधानांना मौदा येथे नेण्यासाठी चार हेलिकॉप्टरचा ताफा तयार होता. परंतु अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, एक तास झाला तरी पाऊस थांबायला तयार नव्हता. हवामान प्रतिकूल झाल्यामुळे एटीसीसह विमानतळावरील वरिष्ठ, पायलट यांनी अशा हवामानात हेलिकॉप्टर उडविण्यास नकार दिला. पंतप्रधान मोदींना मौद्याला न्यायचे कसे, असा प्रश्न सुरक्षा अधिकाऱ्यांना अस्वस्थ करीत होता. आकाशातून शक्य नसल्यामुळे पंतप्रधानांना मौद्याला रस्त्याने (बाय कार) नेण्याचा निर्णय एसपीजीने घेतला. सुरक्षा यंत्रणेवर दडपणया निर्णयामुळे सुरक्षा यंत्रणेवर प्रचंड दडपण आले. कारण मौद्याच्या कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी एकच रस्ता होता. पंतप्रधान येणार म्हणून हा रस्ता सुमारे पाच किलोमीटरपर्यंत अक्षरश: फुलला होता. मिळेल त्या वाहनाने कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी नागगरिकांची, भाजपा कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. अशास्थितीत या रस्त्यावरून पंतप्रधानांना वाहनाने नेणे अत्यंत धोक्याचे (हाय रिस्क) होते. हा धोका पत्करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा तयार नव्हती. सुरक्षा यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये ‘आॅन एअर’ गंभीर चर्चा सुरू झाली. पंतप्रधानांना रस्त्याने नेण्याला अनेक अधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला होता. सुरक्षा व्यवस्थेची अग्निपरीक्षापंतप्रधानांना नागपूर विमानतळावरून मौदा येथील कार्यक्रमस्थळी वाहनातून नेण्याचे दिव्य नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण पोलीस या दोघांनाही पार पाडायचे होते. कारण नागपूर शहरातील सुरक्षेची जबाबदारी शहर पोलीस दल तर, नागपूर बाहेरची नेण्या-आणण्याची सुरक्षा व्यवस्था नागपूर ग्रामीण पोलिसांना सांभाळायची होती. नाही म्हणायला ही व्यवस्था (अर्धीअधुरी) शहर आणि ग्रामीण पोलिसांनी करूनही ठेवली होती. मात्र, सकाळपासून दुपारी २.३० पर्यंत वातावरण स्वच्छ असल्यामुळे या व्यवस्थेकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. त्यात पावसाने रस्ता खराब केला, अन् सुरक्षा व्यवस्थेची अग्निपरीक्षा घेणे सुरू केल्यामुळे शहर आणि ग्रामीण पोलिसांवर अचानक मोठे दडपण आले. सुरक्षा अधिकाऱ्यांमधील कुजबूज वाढली. मोठा धोका नजरेसमोर असल्यामुळे अखेर मौद्याचा कार्यक्रम (पंतप्रधानांचा दौरा) रद्द करण्यावर दुपारी ४.१५ च्या सुमारास एकमत होऊ लागले. वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार, मौदा दौरा रद्द करण्यासाठी सुरक्षा अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांची अनुमती घेण्याचीही तयारी केली. मात्र, पंतप्रधान मोदींना मौद्यात जायचेच होते.