शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Municipal Election 2026 Live: मतदान सुरू होताच जळगाव येथे गोंधळ; गणेश नाईकांना केंद्र सापडेना
2
आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस,'महा'मतदान करू, 'योग्य' सेवक निवडू; २,८६९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
3
आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२६: अचानक धनलाभ, अलौकिक अनुभूती; मान-सन्मानाचा दिवस
4
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला
5
शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातच अटक केल्यावरून उडाला गोंधळ, भाजपने केली होती मागणी
6
मतदारांनो, घरबसल्याच शोधा मतदार यादीमध्ये नाव! निवडणूक आयोगाचे पोर्टल, मोबाइलवर सुविधा
7
उन्हाचा तडाखा अन् उकाडा... मतदानाला सकाळीच पडा बाहेर, मुंबईकर घामाघूम होण्याची शक्यता
8
मुंबईत मतमोजणीत अडचण आली तरच करणार 'पाडू' यंत्राचा वापर; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
9
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
10
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
11
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
12
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
13
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
14
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
15
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
16
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
17
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
18
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
19
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
20
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 23:15 IST

Mission Night Watch: रात्रीच्या वेळी होणारे गुन्हे लक्षात घेता परिमंडळ चारमध्ये ‘मिशन नाईट वॉच’ ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली.

नागपूर: रात्रीच्या वेळी होणारे गुन्हे लक्षात घेता परिमंडळ चारमध्ये ‘मिशन नाईट वॉच’ ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत नियमांचा भंग करणाऱ्या २१७ ढाबे-हॉटेलवर महिन्याभरात कारवाई करण्यात आली. मुदतीहून जास्त वेळ सुरू राहणे किंवा दारूची विक्री करणे या प्रकरणांत या कारवाया झाल्या.

परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी ही मोहीम राबविली. रात्रीच्या वेळेस होणाऱ्या घरफोडी व गैरप्रकारांवर आळा बसावा यासाठी ३० ऑगस्ट पासून मिशन नाईट वॉच ची सुरुवात झाली. यासाठी सर्वात अगोदर परिमंडळ स्तरावर व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला. त्यात सर्व पोलीस ठाण्याचे ठाणेदार व दोन कर्मचारी होते. प्रत्येक ठाण्यातील रात्रपाळीतील अधिकाऱ्यांना दररोज त्यात समाविष्ट करून दुसऱ्या दिवशी काढण्यात येत होते. याअंतर्गत रात्री अधिकारी, कर्मचारी मुदत संपल्यावरदेखील सुरू आस्थापना बंद करणे, आरोपींच्या घरी झडती घेणे, घरफोडीच्या हॉटस्पॉट्सच्या ठिकाणी सायरनसह पेट्रोलिंग करणे असे उपक्रम करत आहेत. विशेष म्हणज कर्तव्यावरील अधिकाऱ्यांना स्पॉटवरून फोटोदेखील टाकावे लागतात. उपायुक्त रश्मिता राव यादेखील रात्रीच्या बंदोबस्तात सक्रिय असतात. तसेच सूचनांप्रमाणे कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना लेखी खुलासादेखील मागविण्यात येतो. दररोजच्या कारवाईचा अहवाल सकाळी १० वाजेपर्यंत तयारदेखील होतो.

क्राईम मॅपिंगवर भरया मोहिमेअंतर्गत पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील घरफोडी व वाहनचोरीचे हॉटस्पॉट्स निश्चित केले. त्याआधारे क्राईम मॅपिंगवर भर देण्यात आला. विशेष म्हणजे एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या वास्तव्याच्या ठिकाणी क्यू आर कोड लावण्यात आले असून बिट मार्शल्सद्वारा त्यांचे पंचिंग केले जाते.

असा आहे रोजचा क्रमरात्री १० ते १२: आस्थापना तपासून कारवाईरात्री १२ ते दोन: घरफोडीच्या रेकॉर्डवरील आरोपींची तपासणीरात्री दोन ते चार: सायरन पेट्रोलिंग व संशयितांची तपासणीपहाटे चार ते सहा: गुडमॉर्निंग पेट्रोलिंग

घरफोडीच्या घटनांत ५७ टक्क्यांनी घट‘मिशन नाईट वॉच’ ही मोहीम सुरू झाल्यावर ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये ५७ टक्क्यांची घट झाली आहे. तर सप्टेंबर २०२४ च्या तुलनेत घरफोडीचे गुन्हे १० हून अधिक संख्येने घटले आहेत.

कारवाई: संख्याहॉटेल/ढाबे आस्थापना वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवणे: १८५सार्वजनिक मैदानात दारू पिणे: ४१६संशयास्पदरित्या फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई: ३१विनापरवाना दारू उपलब्ध करुन देणाऱ्या हॉटेल/ढाब्यांवर कारवाई: ३२

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Police's 'Night Watch' Reduces Burglaries, Acts Against Illegal Establishments

Web Summary : Nagpur police's 'Mission Night Watch' significantly curbed burglaries by 57%. Raids on 217 establishments violating rules, like extended hours and illegal liquor sales, were conducted. Crime mapping and increased patrolling are key strategies.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूर