शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयात माहिती पाठविणे थांबले

By admin | Updated: August 5, 2014 01:04 IST

महसूल कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपाचे परिणाम नागपूर जिल्ह्यात जाणवू लागले आहे. संपकाळात मुंबईला मंत्रालयात माहिती पाठविण्याचे काम पूर्णपणे ठप्प पडले आहे. कास्ट्राईबसह इतरही संघटनांनी

संपाचा चौथा दिवस : आंदोलन अधिक तीव्र होणारनागपूर : महसूल कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपाचे परिणाम नागपूर जिल्ह्यात जाणवू लागले आहे. संपकाळात मुंबईला मंत्रालयात माहिती पाठविण्याचे काम पूर्णपणे ठप्प पडले आहे. कास्ट्राईबसह इतरही संघटनांनी संपाला पाठिंबा जाहीर केल्याने पुढच्या काळात आंंदोलन अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळाले आहे.१ आॅगस्टपासून संपाला सुरुवात झाली. सोमवारी संपाचा चौथा दिवस होता. संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, तहसील कार्यालयातील लिपिक पातळीवर होणारे सर्व कामकाज ठप्प पडले आहे. चार दिवसांपासून जिल्हापातळीवरून मंत्रालय, विभागपातळीवर माहिती पाठविण्याचे काम पूर्णपणे थांबले आहे. त्याची झळ अधिकाऱ्यांनाही बसू लागली आहे. सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागात सामसूम होती. कर्मचारी प्रवेशद्वारावर आंदोलनस्थळी एकत्र आले होते. महत्त्वाच्या कामासाठी तरी मदत करा, अशी विनंती अधिकारी कर्मचाऱ्यांना करीत होते. अधिकाऱ्यांची अडचण समजून कर्मचाऱ्यारीही मदत करीत होते. सेतू कार्यालयातील महसूल कर्मचारी संपावर आहेत. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये, अशी कर्मचाऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळे तातडीचे प्रमाणपत्र काढून देण्यात येत आहे. असे असले तरी सर्वच विभागातील दैनंदिन कामकाज ठप्प आहे.चौथ्या दिवशीही संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्याचे प्रमाण ९० टक्के पेक्षा अधिक होते. विशेषत: महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता.शासनाने संपाची दखल घेऊन तातडीने तोडगा काढावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश जोशी, सरचिटणीस प्रमोद बेले, उपाध्यक्ष ईश्वर बुधे, गोपाल इटनकर, संजय निलावार, मंगशे जाधव, नाना कडवे, श्याम गोसावी, मालती पराते, सुनीती नंद, दिनेश तिजारे, संजय शेंडे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)