शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

देशातील कोट्यवधी लोक बौद्ध धम्माच्या वाटेवर; २०२५ मध्ये धम्मदीक्षेचा भव्य सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 11:01 IST

Nagpur News २०२५ साली दिल्लीतील रामलीला मैदानावर धम्मदीक्षेचा भव्य कार्यक्रम होणार असून त्यात कोट्यवधी लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेतील, अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : देशातील कोट्यवधी लोक बौद्ध धम्माच्या वाटेवर आहेत. त्यासाठी २०२५ साली दिल्लीतील रामलीला मैदानावर धम्मदीक्षेचा भव्य कार्यक्रम होणार असून त्यात कोट्यवधी लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेतील, अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली. (Bhimrao Ambedkar)

एका कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले होते. भीमराव यांनी सांगितले की, एससी-एसटी, ओबीसींसह एकूणच बहुजन समाजाचा मूळ धर्म बौद्ध धम्म आहे. यावर आता विविध समाजघटक उघडपणे चर्चाही करू लागले आहेत. आपल्या मूळ धम्मात परतण्याची लोकांची इच्छा बळावत चालली आहे. भारतीय बौद्ध महासभा देशभरात फिरून जनजागृतीचे कार्य करीत आहे. परंतु हे करीत असताना कुठलाही द्वेष, टीका केली जात नाही. केवळ बुद्धाचे तत्त्वज्ञान समजावून सांगितले जाते. २०२५ सालचे नियोजन आम्ही केले आहे. त्यावर्षी कित्येक कोटी लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेतील. मूळ कार्यक्रम दिल्लीत होईल. त्यानंतर देशातील प्रमुख शहरांमध्येही धम्मदीक्षेचे कार्यक्रम होतील.

यासाठी ऑनलाईन बुकिंग केली जात आहे. कोणता धर्म स्वीकारावा, हा व्यक्तिगत प्रश्न आहे, यात सरकारचा हस्तक्षेप नको. त्यामुळे काही राज्यांनी धर्मांतरणाचा केलेला कायदा हा मुळातच योग्य नाही, असेही ते म्हणाले.

समता सैनिक दलाच्या एकजुटीचा प्रयत्न

सध्याची परिस्थिती अतिशय भयावह आहे. समाजातील तरुणांना रोजगार नाही. अशा परिस्थितीत समता सैनिक दल ही तरुणांची एक महत्त्वाची संघटना आहे. परंतु तीसुद्धा विभागली आहे. तेव्हा ही संघटना एकजूट राहून काम करण्याची गरज आहे. उत्तर भारतात असा प्रयत्न सुरू झाला असून आपण महाराष्ट्रासह देशभरात त्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही भीमराव यांनी सांगितले.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी