शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

हिंगणा मार्गावरील मेट्रोसेवा मंगळवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 10:24 PM

‘महामेट्रो’च्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत ‘रिच-३’मध्ये सीताबर्डी ते लोकमान्यनगर मेट्रो स्थानक मार्गावरील ‘अ‍ॅक्वा लाईन’उद्या २८ जानेवारीपासून सुरू होत आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून दाखवणार हिरवी झेंडीकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री नितीन राऊत राहणार उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘महामेट्रो’च्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत ‘रिच-३’मध्ये सीताबर्डी ते लोकमान्यनगर मेट्रो स्थानक मार्गावरील ‘अ‍ॅक्वा लाईन’उद्या २८ जानेवारीपासून सुरू होत आहे. मंगळवारी सुभाषनगर मेट्रो स्थानकावर सकाळी १०.१५ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘व्हिडीओ लिंक’च्या माध्यमातून हिरवी झेंडी दाखवतील, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी हे देखील या कार्यक्रमात ‘व्हिडीओ लिंक’च्या माध्यमातून सहभागी होतील. याशिवाय राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत, क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, महापौर संदीप जोशी, खा.विकास महात्मे, खा.कृपाल तुमाने, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आ. नागो गाणार, आ. प्रकाश गजभिये, आ. जोगेंद्र कवाडे, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, आ. समीर मेघे, आ. विकास ठाकरे प्रामुख्याने उपस्थित राहतील.सीताबर्डी ते लोकमान्यनगर २० रुपयात प्रवासउद्घाटन सोहळा पार पडल्यावर प्रवासी सेवा सुरू होणार असून, या मार्गिकेवरील स्थानकांवर दर ३० मिनिटांनी मेट्रो ट्रेन प्रवाशांच्या सेवेकरिता सज्ज असेल. दररोज सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत नियमित सेवेचा लाभ घेता येईल. यासाठी दर निश्चित करण्यात आले आहेत. सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर किंवा वासुदेवनगरपर्यंत केवळ २० रुपये लागतील. तसेच सीताबर्डी इंटरचेंज ते सुभाषनगर, इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियर्स किवा झाशी राणी चौक मेट्रो स्टेशन पर्यंतच्या प्रवासासाठी केवळ १० रुपये लागतील. लोकमान्यनगर ते खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, एअरपोर्ट आणि जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनदरम्यान प्रवासी दर ३० रुपये आहे.५० महिन्यात २५ किमी मेट्रोचे बांधकामनागपूरच्या मेट्रोचे काम ज्या गतीने सुरू आहे, ती वाखाणण्याजोगी आहे. ५० महिन्यात २५ किलोमीटर मेट्रो लाईनचे नेटवर्क तयार करण्यात आले आहे. सिव्हील लाईन्स येथील मेट्रो हाऊसमध्ये पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना महामेट्रोचे प्रबंध निदेशक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी ही माहिती दिली.

टॅग्स :Metroमेट्रोUddhav Thackerayउद्धव ठाकरेNitin Gadkariनितीन गडकरीNitin Rautनितीन राऊत