नागपुरात रेल्वेच्या धडकेत गतिमंद विद्यार्थिनीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 22:38 IST2019-10-28T22:33:24+5:302019-10-28T22:38:30+5:30
रेल्वेची धडक बसल्यामुळे एका गतिमंद युवतीचा करुण अंत झाला. निशा राजकुमार इंगोले (वय १८) असे तिचे नाव आहे. निशा मुळची मध्यप्रदेशातील रहिवासी होय. ती मतिमंद शाळेत शिकत होती

नागपुरात रेल्वेच्या धडकेत गतिमंद विद्यार्थिनीचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेची धडक बसल्यामुळे एका गतिमंद युवतीचा करुण अंत झाला. निशा राजकुमार इंगोले (वय १८) असे तिचे नाव आहे.
निशा मुळची मध्यप्रदेशातील रहिवासी होय. तिचे आईवडील तिकडेच राहतात. तर, ती तिच्या आजी आणि मावशीजवळ मानकापुरातील इंदिरा माता नगरात राहत होती. ती मतिमंद शाळेत शिकत होती. रविवारी दुपारी ४.३० च्या सुमारास ती घराजवळच्या रेल्वे लाईनजवळ गेली. रुळ ओलांडत असताना तिला रेल्वेची जोरदार धडक बसली. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी मेयोत नेले असता डॉक्टरांनी निशाला मृत घोषित केले. नीलिमा विशाल सोनवणे (वय २४, रा. इंदिरा मातानगर, मानकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूरचे एएसआय विजय नाईक यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.