शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

नागपुरात देशी दारूच्या दुकानाविरुद्ध पुरुषांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 8:44 PM

आतापर्यंत दारूच्या दुकानाला साधारणपणे महिला विरोध करीत आल्या आहेत. परंतु गोरेवाडा रोडवर नव्याने उघडण्यात येत असलेल्या देशी दारूच्या दुकानामुळे या परिसरातील सर्वच नागरिक संतप्त झाले असून पुरुषांनीच पुढाकार घेत एल्गार पुकारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदनही सादर केले आहे.

ठळक मुद्देगोरेवाडा रोडवरील नव्या दारू दुकानामुळे नागरिक संतप्तमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आतापर्यंत दारूच्या दुकानाला साधारणपणे महिला विरोध करीत आल्या आहेत. परंतु गोरेवाडा रोडवर नव्याने उघडण्यात येत असलेल्या देशी दारूच्या दुकानामुळे या परिसरातील सर्वच नागरिक संतप्त झाले असून पुरुषांनीच पुढाकार घेत एल्गार पुकारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदनही सादर केले आहे.गिट्टीखदान चौक ते गोरेवाडा रोड दरम्यान चौबे कटीया भंडारला लागून असलेल्या मन्नू हिरणवार यांच्या इमारतीमध्ये नवीन देशी दारूचे दुकान उघडले आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. परिसरातील नागरिकांनी याविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करीत या दुकानाला परवानगी मिळू नये, अशी मागणी केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही निवेदन देण्यात आले आहे. नागरिकांनी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधत हे दुकान अवैध असल्याची बाब लक्षात आणून दिली आहे. सर्वप्रथम कुठलेही देशी दारूचे दुकान हे शाळेच्या १०० फुटाच्या आत असून नये, असा नियम आहे. या इमारतीपासून हाकेच्या अंतरावर उर्दू स्कुल आहे. मनपाची अंगणवाडी आणि कॉम्प्युटर इन्स्टिट्युट लागूनच आहे. या संस्था २० वर्षांपासून आहेत.हिरणवार यांची इमारत ही पूर्णत: अनधिकृत आहे. या इमारतीला मनपा किंवा नासुप्रची मंजुरी नाही. त्यावरील बांधकाम अवैध आहे. १८०० चौरस फूटाचा प्लॉट असून त्यावर ३४०० चौरस फुटाचे बांधकाम करण्यात आले आहे. इमारतीच्या बाजूच्या जागेवरही अतिक्रमण केले आहे. पार्किंगसाठी जागा नाही. अशा परिस्थितीत येथे दारू दुकान सुरु झाल्यास वाहतुकीसह सामाजिक सौहार्द बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन परिसरातील नागरिकांचा दारू दुकानाला तीव्र विरोध आहे. तेव्हा याला परवानही देऊ नका, अन्यथा नागरिकांचा उद्रेक होईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. शिष्टमंडळात घनश्याम मांगे, यशवंत तेलंग, राकेश बोबडे, भूपेंद्र ठक्करजी, विकास ओबेरॉय, श्रीराम सिंग, कृष्णदत्त चौबे आदींचा समावेश होता.अधिकाऱ्यांचेही संगनमतयेथील प्रतिष्ठित नागरिकांचे म्हणणे आहे की, ज्या ठिकाणी देशी दारूचे दुकान उघडले जात आहे, ते अवैध आहे. कुठल्याही नियमात ते बसत नाही. इमारत सुद्धा अवैध आहे. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सुद्धा याची कल्पना आहे. मागील २०-२५ दिवसापासून तपास अधिकारी वेगवेगळ्या पद्धतीने जागेचे मोजमाप करीत आहेत. ते करताना तक्रारकर्त्यांना नागरिकांनाही विश्वासात न घेता एकतर्फी कार्यवाही करतात, त्यामुळे अधिकाºयांचेही संगनमत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.एक कि.मी. परिसरात आधीच तीन-चार देशी दारूचे दुकानजानेवारी २०१९ मध्ये महाराष्ट्र शासनाने देशी दारूचे दुकान १ कि.मी. च्या आत उघडण्यास मनाई केलेली आहे. गिट्टीखदान चौक ते अनंतनगर पर्यंत या अर्धा कि.मी. अंतरवर किमान ३ ते ४ दारूची दुकाने आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा नवीन दारूच्या दुकानाला परवानगी कशी दिली जाऊ शकते, असा प्रश्नही येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.२२ जुलैपासून आंदोलनयेथील नागरिकांचे म्हणणे आहे की, यापूर्वीही येथे दारू दुकान सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, तेव्हा नागरिकांनी प्रचंड विरोध केला होता. त्यामुळे तो प्रयत्न फसला. परंतु पुन्हा दारूचे दुकान उघडले जात आहे. त्यामुळे नागरिक संतापले आहे. नागरिकांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे. याची सुरुवात निवेदनाद्वारे करण्यात आली असून येत्या २२ जुलैपासून आंदोलनला सुरुवात केली जाईल.

 

टॅग्स :liquor banदारूबंदीagitationआंदोलन