शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया, राहुल गांधी यांची उद्या सभा

By admin | Updated: April 10, 2016 03:05 IST

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता कस्तूरचंद पार्कवर आयोजित सभेसाठी काँग्रेस सज्ज झाली आहे.

दीक्षाभूमीवर जाऊन दर्शनही घेणार : काँग्रेस सज्ज, गर्दीची अपेक्षा नागपूर : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता कस्तूरचंद पार्कवर आयोजित सभेसाठी काँग्रेस सज्ज झाली आहे. दोन्ही नेते प्रारंभी दीक्षाभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेणार आहेत. या सभेचे जोरात नियोजन करण्यात आले असून लाखावर गर्दीची काँग्रेसला अपेक्षा आहे. बैठकांचे सत्र आटोपल्यानंतर आता तयारीचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त काँग्रेसने देशभर विविध कार्यक्रम आयोजित केले. आता ११ एप्रिल रोजी नागपुरात समारोपीय सोहळा होत आहे. या सोहळ्यासाठी अ.भा. काँग्रेस समितीचे सर्व पदाधिकारी, काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षनेते, खासदार, माजी खासदार आदी सुमारे पावणेदोनशे व्हीआयपी उपस्थित राहणार आहेत. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण शनिवारी दुपारनंतर नागपुरात दाखल झाले. पदाधिकाऱ्यांसह त्यांनी दीक्षाभूमीची पाहणी केली. तेथील व्यवस्था, सुरक्षेचा आढावा घेतला. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर त्यांनी कस्तूरचंद पार्कची पाहणी केली. त्यांच्यासोबत माजी मंत्री नितीन राऊत, आ. विजय वडेट्टीवार, आ. भाई जगताप, महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष चारुलता टोकस, अनंतराव घारड, शहर अध्यक्ष विकास ठाकरे आदी पदाधिकारी होते. यानंतर सायंकाळी नेत्यांकडून तयारीचा आढावा घेण्यात आला. सभेसाठी सुमारे दोन लाख लोक येतील, असे नियोजन प्रदेश काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे. प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण सभेपर्यंत नागपुरात तळ ठोकून बसणार आहेत.