तिन्ही सैन्य दल अधिकाऱ्यांची बैठक

By Admin | Updated: August 21, 2016 03:27 IST2016-08-21T03:27:06+5:302016-08-21T03:27:06+5:30

भारतीय वायुसेना, नौसेना आणि थलसेना या देशाच्या तिन्ही सैन्य दलाच्या प्रिन्सिपल मेंटेनन्स आॅफिसर्स

Meeting of the three army officers | तिन्ही सैन्य दल अधिकाऱ्यांची बैठक

तिन्ही सैन्य दल अधिकाऱ्यांची बैठक

वरिष्ठ सैन्य अधिकारी होणार सहभागी
नागपूर : भारतीय वायुसेना, नौसेना आणि थलसेना या देशाच्या तिन्ही सैन्य दलाच्या प्रिन्सिपल मेंटेनन्स आॅफिसर्स समितीची महत्त्वपूर्ण बैठक नागपुरात आयोजित करण्यात आली आहे.
वायुसेनानगरस्थित भारतीय वायुसेनेच्या अनुरक्षण कमान मुख्यालयात २२ व २३ आॅगस्ट रोजी ही बैठक होणार असून यात देशाच्या तिन्ही सैन्य दलातील अनुरक्षण शाखेतील वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय नौसेनेचे चीफ आॅफ मटेरियल्स व्हाईस अ‍ॅडमिरल ए. व्ही. सुभेदार हे भूषवतील. भारतीय वायुसेनेच्या प्रतिनिधींचे नेतृत्व एअर आॅफिसर मेन्टेनन्स एअर मार्शल पी. पी. खांडेकर करतील. तर अ‍ॅडिशनल डायरेक्टर जनरल मेजर जनरल एम.जे. एस. स्याली हे भारतीय थलसेनेचे नेतृत्व करतील.
ही समिती तिन्ही सैन्यदलास अनुरक्षण संबंधित मुद्यांवर समाधान शोधते सैन्य दलातील सामान्य उपकरण व प्रणालींशी संबंधित धोरण तयार करणे.
दुरुस्ती, उत्पादन, जीर्णोद्धार, स्वदेशीकरण, मिडलाईफ, तंत्रज्ञानाचा विकास, सहकाऱ्यांशी संबंधित सुविधा व सूचनांचे आदानप्रदान करण्याचे व्यासपीठ म्हणजे ही समिती होय. त्यामुळे सैन्य दलातील ही अतिशय महत्त्वाची समिती आहे.
समितीच्या या बैठकीत देशाच्या सुरक्षेसाठी सैन्यदल कुठल्याही मोहिमेसाठी किती तयार आहे, किती सक्षम आहे, या उद्देशाने अनुरक्षण योजनांचेआदानप्रदान करणे व एकजुटीने पुढे कसे जाता येईल, यावर चर्चा होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Meeting of the three army officers