शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

मेडिकल : वाढणार पीजीच्या १२८ जागा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 01:29 IST

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एमसीआय’च्या नव्या निकषानुसार शिक्षकांचा अनुभव, युनिटची संख्या व खाटेनुसार नागपूर मेडिकलमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) १२५ तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील तीन जागा अशा एकूण १२८ जागा वाढण्याची शक्यता आहे. मेडिकल प्रशासनाकडून या संदर्भातील प्रस्ताव बुधवारी वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठविला जाणार आहे.

ठळक मुद्देएमसीआयचे नवे निकष : आता अनुभवी सहयोगी प्राध्यापकांना मिळणार पीजीच्या तीन जागा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एमसीआय’च्या नव्या निकषानुसार शिक्षकांचा अनुभव, युनिटची संख्या व खाटेनुसार नागपूर मेडिकलमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) १२५ तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील तीन जागा अशा एकूण १२८ जागा वाढण्याची शक्यता आहे. मेडिकल प्रशासनाकडून या संदर्भातील प्रस्ताव बुधवारी वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठविला जाणार आहे.पूर्वी ‘एमसीआय’च्या निकषानुसार प्राध्यापकाला तीन, सहयोगी प्राध्यापकाला दोन तर सहायक प्राध्यापकाला एक ‘पीजी’ विद्यार्थी मिळायचा. आता ज्या सहयोगी प्राध्यापकाला तीन वर्षे पूर्ण झाली असतील व या काळात शोधनिबंध सादर केले असतील तर त्यालाही तीन जागा मिळणार आहेत. या शिवाय, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक असलेल्या एका ‘युनिट’कडे ४० खाटांचा वॉर्ड असेल तर अशा युनिटला पाच पीजीचे विद्यार्थी मिळतील. या शिवाय, ज्या युनिटमध्ये प्राध्यापक नाही, परंतु सहयोगी प्राध्यापकाला तीन वर्षांचा अनुभव आहे आणि दोन सहायक प्राध्यापक आहेत अशा युनिटलाही पाच पीजीचे विद्यार्थी देण्याचा निर्णय ‘एमसीआय’ने घेतला आहे. या संदर्भातील एक पत्र ४ एप्रिल रोजी सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना प्राप्त झाले आहे. त्यानुसार ‘एमसीआय’ने वाढीव पीजीच्या जागांचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागपूर मेडिकल बधिरीकरण विभागाच्या वाढीव नऊ, बालरोग विभागाच्या वाढीव पाच, रेडिओलॉजी विभागाच्या वाढीव १६, नेत्ररोग विभागाच्या वाढीव तीन, औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या वाढीव सहा, स्त्री रोग व प्रसूती विभागाच्या वाढीव सहा, जनरल शल्यक्रिया विभागाच्या वाढीव १३, अस्थिरोग विभागाच्या वाढीव नऊ, विकृतीशास्त्र विभागाच्या वाढीव १४, मायक्रोबायलॉजी विभागाच्या वाढीव ३०, औषधनिर्माणशास्त्र विभागाच्या वाढीव चार, कम्युनिटी मेडिसीन विभागाच्या वाढीव आठ व कान, नाक व घसारोग विभागाच्या वाढीव दोन अशा एकूण १२५ तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्ट्रालॉजी विभागाच्या वाढीव एक, कार्डिओलॉजी विभागाच्या वाढीव दोन अशा एकूण १२८ जागांचा प्रस्ताव सादर करणार आहे. ‘एमसीआय’च्या निकषानुसारच या वाढीव जागा पाठविण्यात येत असल्याने एवढ्या जागा वाढतीलच अशी, अपेक्षाही केली जात आहे.सध्या मेडिकलमध्ये विविध विषयांच्या मिळून पीजीच्या १७५ जागा आहेत. यात १२८ची भर पडल्यास ३०३ जागा होण्याची शक्यता आहे. याचा फायदा विदर्भातील विद्यार्थ्यांना होईल. सर्वाधिक पीजीच्या ३५ जागा ‘जनरल सर्जरी’ विभागाकडे असणार आहे.पाच विभागाने नाकारल्या वाढीव जागाविद्यार्थी मिळत नसल्याने ‘फिजीओलॉजी’, ‘बायोकेमेस्ट्री’, ‘स्कीन’, ‘अ‍ॅनाटॉमी’ व ‘फॉरेन्सिक’ विभागाने वाढीव जागा नाकारल्या आहेत. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी संबंधित विभागाकडून तसे पत्र लिहून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.वाढीव पीजी जागांची गरजएमबीबीएस विद्यार्थ्यांच्या तुलनेत आजही पीजीच्या जागा फार कमी आहेत. पीजीच्या जागा वाढल्यास विशेषज्ञ डॉक्टरांची संख्या वाढेल. यामुळे शासकीय महाविद्यालयांसाठी ही एक संधी आहे. मेडिकलने वाढीव १२८ पीजी जागांचा प्रस्ताव तयार केला आहे.डॉ. सजल मित्राअधिष्ठाता, मेडिकल

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयStudentविद्यार्थी