शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय निष्काळजीपणाची याचिका फेटाळली

By admin | Updated: July 2, 2014 00:57 IST

खामला येथील एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयात २१ एप्रिल २०१२ रोजी परासिया (छिंदवाडा) येथील महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. यासंदर्भात दाखल फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च

हायकोर्ट : वैद्यकीय मंडळाने नाकारले आरोपनागपूर : खामला येथील एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयात २१ एप्रिल २०१२ रोजी परासिया (छिंदवाडा) येथील महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. यासंदर्भात दाखल फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वैद्यकीय मंडळाचा अहवाल तपासल्यानंतर फेटाळून लावली आहे.नंदेशकुमार पहाडे असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. त्यांची आई दुखवतीबाईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याचा आरोप लावून याप्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी करण्यात यावी व रुग्णालयाने पाच लाख रुपये भरपाई द्यावी, अशी याचिकाकर्त्याची विनंती होती. न्यायालयाने ११ डिसेंबर २०१३ रोजी मृत्यूच्या कारणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, वैद्यकीय मंडळाने गेल्या २९ जानेवारी रोजी अहवाल सादर करून उपचारादरम्यान वैद्यकीय निष्काळीपणा झाल्याच्या आरोपाचे खंडन केले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.न्हाणीघरात पडल्यामुळे दुखवतीबाईच्या हाताचे हाड तुटले होते. त्यांना २० एप्रिल २०१२ रोजी सकाळी ८ वाजता शस्त्रक्रिया विभागात नेण्यात आले. काही वेळानंतर त्यांना शस्त्रक्रिया न करताच बाहेर आणले. तेव्हा त्या मृत्यू झाल्याप्रमाणे निपचित पडल्या होत्या. परंतु, डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता त्यांना मृत घोषित केले. यामुळे पहाडे यांनी तत्काळ धंतोली पोलिसांकडे तक्रार नोंदवली. रुग्णालय व्यवस्थापन मृत्यूमागचे खरे कारण लपवत आहे, असा पहाडे यांचा आरोप होता. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. राहुल कुरेकार, तर शासनातर्फे एपीपी संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)