शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय आयुक्तांकडून मेडिकलची पाहणी

By admin | Updated: February 18, 2015 02:35 IST

मेडिकलमधील अस्वच्छता, गर्दी, सुरक्षा व इतर विषयांच्या याचिकेवर न्यायालयाने नुकताच निकाल दिला. न्यायालयाच्या सूचनेनंतर विभागीय आयुक्त ...

नागपूर : मेडिकलमधील अस्वच्छता, गर्दी, सुरक्षा व इतर विषयांच्या याचिकेवर न्यायालयाने नुकताच निकाल दिला. न्यायालयाच्या सूचनेनंतर विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी शनिवारी मेडिकलमध्ये जाऊन पाहणी केली. विविध वॉर्ड, विभागांना भेटी देऊन समाधान व्यक्त केले.डिसेंबर २०१४ रोजी, सामाजिक कार्यकर्ते दिनानाथ वाघमारे यांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्या याचिकेत मेडिकलमध्ये अस्वच्छता, औषधांचा तुटवडा, नातेवाईकांची प्रचंड गर्दी, सुरक्षेचा अभाव, डॉक्टरांची मनमानी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना होणारा त्रास, प्रशासनाचे दुर्लक्ष आदी विषयांचा समावेश होता. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांच्या कार्यकाळात ही याचिका दाखल झाली होती. त्यानंतर अधिष्ठातापदी रुजू झाल्यानंतर डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी स्वच्छतेचा विषय हाती घेऊन संपूर्ण रुग्णालय व महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. आता रुग्णालयात स्वच्छता नजरेस पडते. याशिवाय पासेसद्वारे गर्दी कमी करण्याचा प्रयत्न, सुरक्षारक्षकांचा नियमित वावर, औषधांचा तुटवडा दूर करणे आदींसह अनेक कामांना प्राधान्य देऊन मेडिकलची अव्यवस्था रुळावर आणली. पण, जुन्या याचिकेचा न्यायालयात नुकताच निकाल लागला. मेडिकलमध्ये काय व्यवस्था आहे याची पाहणी करून अहवाल देण्याचे आदेश न्यायालयाने विभागीय आयुक्त अनुप कुमार यांना दिले. त्यानुसार ते मेडिकलमध्ये धडकले. परंतु मेडिकलचे बदललेले चित्र पाहून समाधान व्यक्त केले. त्यांनी बाह्यरुग्ण विभागापासून ते स्वाईन फ्लू वॉर्डाची माहिती घेतली. वॉर्डांना भेटी दिल्या. डॉक्टर व विद्यार्थ्यांविषयी माहिती घेऊन आढावा घेतला. याशिवाय अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्यासोबत स्वत: आयुक्तांनी झाडू हातात घेऊन परिसर स्वच्छ केला. सर्वत्र स्वच्छता आढळून आल्याने अनुप कुमार यांनी भेटीअंती एकूणच व्यवस्थेवर मेडिकल प्रशासनाचे कौतुक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, विभाग प्रमुख डॉ. अरुण हुमणे, डॉ. अशोक मदान, डॉ. बोकडे, डॉ. एम.जी. मुद्देश्वर, डॉ. सजल मित्रा आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)